Team MyPuneCity -आदर्श प्रशासक, न्यायी शासक आणि धार्मिक महिला म्हणून इतिहासाच्या पानांमध्ये आपले नाव नोंदवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दरवर्षी 31 मे रोजी साजरी केली जाते. यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती साजरी केली जात आहे.आळंदी येथे आळंदी नगरपरिषदेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मोठ्या उत्साहात करण्यात साजरी आली.
यावेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण केला.व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आळंदी नगरपरिषदेचे सर्व आधिकारी ,कर्मचारी यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्मोत्सवा निमित्त आळंदी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी पुण्यश्लोक सामाजिक विकास प्रतिष्ठाण सकल हिंदू समाज व समस्त ग्रामस्थ आळंदी देवाची यांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डी जे वर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची गीते लावण्यात आली होती.तर लहान मुलींनी या मिरवणुकीत लाठीकाठी व युध्द कलेचे प्रात्यक्षिक केले.या प्रत्यक्षिकांचे नागरिकांकडून कौतुक होत होते.

