Team MyPuneCity – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ७५० जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दि.९ रोजी उपुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आळंदीमध्ये आगमन झाले होते. सप्तशतकोत्तर सोहळ्यानिमित्त इंद्रायणी तीरावर दिपोत्सव सोहळा ( Alandi ) साजरा करण्यात आला.
या सोहळ्यावेळी उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या सप्तशतकोत्तर सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले. ही ज्ञानभूमी आहे ती पुन्हा पुन्हा प्रत्येकाला बोलावते. त्यामुळे लोक पुन्हा पुन्हा या ठिकाणी येतात.आळंदी म्हणजे आनंद देणार ( Alandi ) स्थान आहे.
Rashi Bhavishya 10 May 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
मी पहिला मुख्यमंत्री असेल या सोहळ्यास उपस्थित राहता आले. गीतेचे तत्वज्ञान ज्ञानेश्वरीमुळे मराठी भाषेत सर्वसामान्य माणसाला सहज उपलब्ध झाले. आपल्या निरपराध लाडक्या बहिणीचे कुंकू पुसण्याचे काम काम ज्या पाक धार्जिण्या आंतकवाद्यानी केले, त्याला प्रत्युत्तर देण्याचे काम पंतप्रधान यांनी केले. भारतीय सैन्याने सिंदूर ऑपरेशन ( Alandi ) राबविले.
त्यांचे सर्वांनी स्वागत केले आहे. हा नवा भारत आहे, कुठल्याही दहशतवाद्याने भारताकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत करू नये, अश्या प्रकारचे चोख उत्तर आपले सीमेवरचे जवान देत आहेत. मानवता ,सेवाभाव व योगसाधनायाचे महत्त्व ज्ञानेश्वरीने सांगितले आहे. वारकरी भाविकांची इच्छा आहे ,इंद्रायणी प्रदूषण मुक्त झाली पाहिजे. केंद्र व राज्य सरकारने मिळून हे काम करायचे आहे. एसटीपीची सुद्धा याबाबत कामे सुरू झाली आहेत.जे जे काही लागेल ते आपण करू व इंद्रायणी स्वच्छ शुद्ध करू.प्रदूषण मुक्त करू.
तसेच भक्तनिवास यासाठी नगरविकास माध्यमातून २५ कोटी निधीची सोय करू व ज्ञानभूमी आराखडा
साठी प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. प्रसार माध्यमांशी विविध प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले,
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हामध्ये हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करत आहेत. स्वतः ला भाग्यवान समजतो माऊलींच्या ७५० व्या जन्मोत्सव निमित्त तसेच मागे मुख्यमंत्री असताना पालखी प्रस्थान सोहळ्यास उपस्थित राहिलो. वैष्णव, वारकरी यांच्या मेळाव्यात सहभागी होता आले. मी एक शेतकरी व वारकरी आहे. त्याचा आनंद आहे. माऊलींच्या आदर्शावरच सर्व चालू आहे.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक अफवा आहेत. याबाबत ते म्हणाले , माऊलींकडे एकच साकडे आहे आपल्या राज्यात देशाचे रक्षण व्हावं. आपल्या नागरिकांना सुख समाधान आनंद मिळावे. निरपराध पर्यटकांवर जो हल्ला झाला त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. या पाक धार्जिण्या आतांकवाद्यांना जशास तसे उत्तर मिळेल असे म्हणत होतो. पण त्याच्याही पुढे गोळीचे उत्तर मिसाईलने मिळाले ( Alandi ) आहे.
Maval News : मावळ मनसेचा मोठा पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर….इंजिन थांबवून तुतारी फुंकणार ?
पाकिस्तानने आपल्या औकातीत राहून भारताशी पंगा घ्यावा.भारत हा नवा भारत आहे. खोट्या अफवा पसरवत आहेत. त्यावर विश्वास ठेवू नये. अधिकृतपणे ज्या सरकारकडून सूचना येतील. त्याचे पालन करावे. राज्य सुरक्षा व्यवस्था आढावा मुख्यमंत्री यांनी घेतला आहे. सैन्य , पोलीस व सर्व विभाग अलर्ट आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यावर संकट येऊ नये, देशावर संकट येऊ नये ते परतवण्याची हिंमत आपल्या लष्करात आहे.
पाकिस्तानचे माकड चाळे त्यांचे चालू आहेत. त्यांची औकात नाही भारताबरोबर पंगा घ्यायची.
त्यांनी जर त्यांची नाटकं थांबवली नाही . तर आपल्या देशाचे सैनिक लष्कराचे जवान पाकिस्तानचे नामोनिशाण मिटवल्या शिवाय राहणार नाही.
पंतप्रधान यांनी तो संकल्प केला आहे. तसेच यावेळी इंद्रायणी मातेची आरती त्यांच्या हस्ते करण्यात आली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ७५० जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मोठ्या उत्साहात रथोत्सवात हजारो भाविक हरिनाम गजरात सहभागी झाले होते. तसेच इंद्रायणी दीपोत्सव सोहळात सहभागी झाले ( Alandi ) होते.