Team MyPuneCity – पंजाबी समाजातील विवाह इच्छुकांसाठी पंजाबी वेलफेअर फाउंडेशनच्या (पीसीएमसी) वतीने “मिलाप” विवाह परिचय मेळाव्याचे आयोजन दिनांक ११ मे २०२५, रविवार रोजी करण्यात आले (Akurdi News)आहे. हा कार्यक्रम सकाळी १०:३० ते २:३० या दरम्यान गुरुद्वारा ओल्ड एज होम, आकुर्डी गुरुद्वाराच्या मागे, आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ या ठिकाणी होणार आहे.
Chinchwad News : ‘गांधीजी हे अद्भुत गारुड ‘ – डाॅ. विश्वंभर चौधरी
हा मेळावा विवाह इच्छुक मुला-मुलींसाठी एक व्यासपीठ आहे, जिथे ते आपल्या भावी जोडीदाराची ओळख करू शकतात. प्रत्येक उमेदवाराने आपल्या पालक किंवा कुटुंबासह उपस्थित (Akurdi News) राहणे बंधनकारक आहे.
हा कार्यक्रम पूर्णतः विनामूल्य असून, नोंदणीची अंतिम तारीख 10 मे २०२५ आहे.
🔗 नोंदणीसाठी गूगल फॉर्म लिंक:
https://forms.gle/B9u9WWfdAnpFhWuq9
(फक्त नवीन उमेदवारांसाठी)
Talegaon Dabhade: कलापिनी निर्मित ‘सय सरी’ या मूकनाट्याचा रौप्य महोत्सवी प्रयोग संपन्न
संपूर्ण देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण भारतातून अनेक पंजाबी कुटुंबे या कार्यक्रमासाठी नोंदणी करत आहेत. समाजात आपुलकी, जिव्हाळा आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी हे व्यासपीठ फारच उपयुक्त ठरत आहे.अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र वधवा आणि सचिव हरेश मन्धान (Akurdi News) यांनी दिली.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
लीना सप्रा – 📞 9860607127,
गीता वोहरा – 📞 9146810007,
योगिता भाटिया – 📞 9145456724,
किशोर कन्ट्रोड – 📞 8999812408