Team My Pune City – जोकरचा मास्क घालून हातात चाकू ( Akurdi News) घेऊन फिरत असलेल्या एका व्यक्तीस निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी सकाळी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला पकडले. या व्यक्तीची ओळख मच्छिंद्र नारायण नवघिरे (वय 68, रा. आकुर्डी गावठाण) अशी झाली आहे.
शुक्रवारी सकाळी पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी परिसरात जोकरचा मास्क घातलेला एक व्यक्ती हातात चाकू घेऊन फिरताना दिसला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण( Akurdi News) निर्माण झाले. हा प्रकार सोशल मीडियावर चित्रीत करून टाकण्यात आला. त्यामध्ये ‘बॅटमॅन’ चित्रपटातील खलनायक ‘जोकर’चा उल्लेख करत “बॅटमॅन फिल्मचा जोकर पिंपरी-चिंचवडमध्ये” अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ वेगाने शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ आकुर्डी येथील ब्रह्मा हॉटेलजवळ चित्रीत करण्यात आला होता.
माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला खबर देण्यात आली. त्यानंतर निगडी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि या संशयित व्यक्तीस ताब्यात घेतले.( Akurdi News) शुक्रवारी सकाळी पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी परिसरात जोकरचा मास्क घातलेला एक व्यक्ती हातात चाकू घेऊन फिरताना दिसला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
हा प्रकार सोशल मीडियावर चित्रीत करून टाकण्यात आला. त्यामध्ये ‘बॅटमॅन’ चित्रपटातील खलनायक ‘जोकर’चा उल्लेख करत “बॅटमॅन फिल्मचा जोकर पिंपरी-चिंचवडमध्ये” अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ वेगाने शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ आकुर्डी येथील ब्रह्मा हॉटेलजवळ चित्रीत करण्यात आला होता. माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला खबर देण्यात आली. त्यानंतर निगडी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि या संशयित व्यक्तीस ( Akurdi News)ताब्यात घेतले.
निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे यांनी सांगितले की, “आम्हाला एक व्यक्ती चाकू घेऊन फिरत असून लोकांमध्ये भीती निर्माण करत असल्याची माहिती मिळाली होती. आमची टीम लगेच घटनास्थळी पोहोचली आणि शीतला देवी चौक परिसरातून त्याला पकडले. त्याला पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने सांगितले की, तो कचरा गोळा करण्याचे काम करतो व कचऱ्याच्या पोत्यांना कापण्यासाठी तो चाकू वापरतो. त्याला ताब्यात घेण्यात ( Akurdi News) आले आहे.”