Team My Pune City – आकुर्डी येथे सार्वजनिक ठिकाणी ( Akurdi Crime News) बेकायदेशीरपणे गांजा बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.15) 6 वाजता खंडोबामाळ चौक, आकुर्डी येथील रस्त्यावर घडली.
या प्रकरणात पोलीस हवालदार सुधाकर तुकाराम अवताडे (निगडी पोलीस ठाणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जयश संजय धोंगडे (18, पिंपरी) याला अटक करण्यात ( Akurdi Crime News) आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जयश धोंगडे याच्या ताब्यात 12 हजार 100 रुपये किमतीचा 204 ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या बाळगलेला आढळला. या प्रकरणी निगडी पोलीस तपास करत ( Akurdi Crime News) आहेत.