Team MyPuneCity – आकुर्डी गावठाण, पंचतारानगर, गुरुदेवनगर, पांढरकर वस्ती परिसरात वारंवार लाईट जाण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज ( Akurdi) लाईट जाणे हा नित्यनियम झाला असून त्यामुळे तेथील स्थानिक नागरिक या विजेच्या लपंडावाला वैतागून गेले आहेत. काल ( दि १० जून रोजी ) आकुर्डी परिसरातील नागरिकांनी भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता देवकर , उपअभियंता जाधव आणि कनिष्ठ अभियंता देशपांडे मॅडम यांची भेट घेऊन त्यांना परिसरातील विजेच्या समस्येबद्दल सांगितले. त्यावर तेथील अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर दूर करू असे आश्वासन दिले.

PCMC Election : पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ प्रभागांमध्ये होणार १२८ नगरसेवकांची निवड
भविष्यात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे आवश्यक आहे. तो ट्रान्सफॉर्मर डी.पी.डी.सी. च्या माध्यमातून बसवून देतो असे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच दि. ११ जून रोजी सर्व एमएसईबी चे सर्व अधिकारी वरील ठिकाणी पाहणी दौरा करून त्या संबधीचा अहवाल ताबडतोब त्या विभागातील वरिष्ठांना सदर करणार आहेत, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
सदरचे निवेदन देताना सचिन पांढरकर, रामभाऊ पांढरकर, पंढरीनाथ थरकुडे, रामभाऊ दातीर पाटील, तुकाराम बागल, चतुर पांढरकर, अजय भालेराव, मोहन यादव, गिरीश कुलकर्णी, रोशन शिर्के आदी उपस्थित ( Akurdi) होते.