Team My Pune City –राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ,अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत . आज त्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात जनसंवाद घेतला. नागरिकांचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. त्यांनतर त्यांनी विविध प्रश्नांवर पत्रकारांशी संवाद साधला.
आगामी महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष स्वबळावर लढणार की महायुतीत असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला होता, यावरही भाष्य केले. ते म्हणाले ,राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना शहरात चांगली कामे केली. त्यामुळे पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन केले.
Uddhav Thackeray:मतदान कुणाला जातं हेच कळत नाही! -उद्धव ठाकरे
Nutan Engineering College : नूतन कॉलेजमध्ये “एॅडव्हान्स टेक्नॉलॉजीवर परिसंवादाचे आयोजन
पुढे म्हणाले , ‘महाविकास आघाडीत एकत्र काम करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी असावी असा प्रयत्न त्याकाळी करत होतो. आता आम्ही महायुतीमध्ये आम्ही आहोत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती असावी आमची अपेक्षा आहे.’ विरोधी पक्षनेताही मीच ठरवायचो.माझ्या नेतृत्वाखाली सहकाऱ्यांनी १९९२ पासून २०१७ पर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेत चांगले काम केले. त्यावेळी अनेक वर्षे विरोधी पक्षनेता कोण असावा, हे देखील मीच ठरवत होतो. विरोधकांना विश्वासात घेऊन निर्णय घेत होतो. खेळीमेळीच्या वातावरणात महापालिकेचे कामकाज केले. टोकाचे मतभेद निर्माण होऊ दिले नाहीत. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची देखील कामे केली आहेत. ‘हिंजवडीतील कामांना गती दिली आहे. बेशिस्त अवजड वाहनांवर कारवाईच्या सूचना दिल्या जातील, असे पवार यांनी सांगितले.
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प नियोजित केला. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प सुरू करून पाणी आणावे लागणार आहे. असाही ते म्हणाले.
महापालिकेने विविध कामासाठी कर्जरोखे उभारले आहे. महापालिकेला कर्जबाजारी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे याची वस्तुस्थिती तपासण्याची सूचना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
पवार कुटुंबाची यंदा दिवाळी होणार कि नाही यावर अजित पवार म्हणाले ,पवार कुटुंबात दुःखद घटना घडली आहे. राज्यातील अनेक भागात पूर परिस्थितीमुळे मोठे नैसर्गिक संकट आले आहे. त्यामुळे यंदा पवार कुटुंबाचा दिवाळीतील पाडवा एकत्रित साजरा होणार नाही.