situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ajit Pawar: स्वच्छ सर्वेक्षण २०२५ -२६ मध्ये अव्वल स्थान मिळवण्यासाठी महानगरपालिकेसोबत लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वयंसेवी संस्था अशा सर्वांचे एकत्रितपणे प्रयत्न आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार

Published On:
ajit pawar

शहर स्वच्छतेत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ च्या पुर्वतयारीचा झाला प्रारंभ..

Team My Pune City -पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही औद्योगिक नगरी तसेच कामगारांची, कष्टकऱ्यांची नगरी म्हणून देखील आहे. परंतु आता पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छ, हरित आणि समृद्ध शहर आपल्याला बनवायचे आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये या शहराला अव्वल स्थान मिळवण्यासाठी महापालिकेसोबत लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वयंसेवी संस्था अशा सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले,यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ती मदत देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

भारत सरकारच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये पिंपरी चिंचवड शहर देशात सातवे तर राज्यात प्रथम क्रमांकाचे शहर ठरले आहे. याशिवाय शहराला ७ स्टार कचरामुक्त शहर व वॉटर-प्लस प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. याबद्दल पिंपरी चिंचवड महापालिकेला केंद्र शासनाने पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. या यशामध्ये सहभाग घेऊन योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ च्या पुर्वतयारीचा प्रारंभ आज चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.


Nutan Maharashtra Engineering : आधुनिक उद्योगांवर आर्टिफिशियल इंटेलिजंसचा सकारात्मक परिणाम – डॉ. दीपक शिकारपूर

Adkar Foundation : पंढरीच्या वारीमुळे मराठी भाषा टिकून – डॉ. सदानंद मोरे


याप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी महापौर योगेश बहल, माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसदस्य नाना काटे, प्रशांत शितोळे, नारायण बहिवरे, पंकज भालेकर, शाम लांडे, उत्तम शेट्टी, स्वाती उर्फ माई काटे, माजी नगरसदस्य, नगरसदस्या, विविध सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

ajit pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आर.आर.आर. सेंटर डॅशबोर्ड प्रणाली, शून्य कचरा प्रकल्प डॅशबोर्ड प्रणाली, स्वच्छ शौचालय ॲप, स्वच्छता सर्वेक्षण २०२५-२६ मॅस्कॉट व घोषवाक्याचे तसेच हरित सेतू प्रकल्प बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. या प्रकल्पांबाबत माहिती देणारी तसेच महापालिकेच्या वतीने पर्यावरण विषयक राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती देणारी चित्रफित यावेळी दाखवण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी साथ दिली तर आपले शहराच्या देशात पहिल्या तीन मध्ये नक्कीच क्रमांक मिळेल. या पद्धतीने नियोजन करून त्यादृष्टिने आजपासूनच कामाला सुरुवात करूया. शहरातील लोकसंख्या वाढत असताना, नागरिकरण वेगाने होत असताना आपण शहराच्या स्वच्छतेला देखील महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. स्वच्छतेची सुरुवात ही स्वतःपासून करणे गरजेचे आहे. महापालिका शहर स्वच्छ रहावे, यासाठी प्रयत्न करीत असतेच. परंतु त्याला शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था अशा सर्वांचीच साथ गरजेची असते, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

पिंपरी चिंचवड शहरात दररोज १ हजार ४०० टन कचरा निर्माण होतो. लोकांचे राहणीमान बदलत असताना कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे, याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, देशात स्वच्छता सर्वेक्षणात इंदोर शहर प्रथम येते, यामध्ये तेथील नागरिकांचा वाटा महत्त्वाचा आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी देखील त्यादृष्टिने महापालिकेस सहकार्य़ करावे. अनेकदा आपण जेव्हा परदेशात जातो, तेव्हा तेथील नियम पाळतो. कचरा रस्त्यावर, उघड्यावर टाकत नाही. कारण दंड होईल अशी भिती असते. परंतु भारतामध्ये हे नियम पाळत नाही. भारत ही आपली मातृभूमी आहे. येथेच आपल्याला पुढची पिढी घडवायची आहे. अशा वेळी आपल्या शहरात देखील स्वच्छता राहील, याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्याची सुरुवात स्वतःपासून करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

खासदार श्रीरंग आप्पा बारणे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात घनकचरा व्यवस्थापन करण्यास चांगले प्राधान्य दिले आहे. नागरिकांना चांगल्या सेवा मिळाव्यात, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका सातत्याने प्रयत्न करीत असते. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला नागरिकांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. शहरात आगामी काळात पवना, इंद्रायणी, मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. परंतु हे करीत असताना नद्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असेही खासदार बारणे यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त शेखर सिंह स्वागतपर प्रास्ताविक करताना म्हणाले की, स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये पिंपरी चिंचवड शहराला मिळालेल्या यशाचे खरे शिल्पकार आपले स्वच्छता सेवक व शहरातील नागरिक आहेत. आपल्याला स्वच्छतेच्या बाबतीत देशात पहिला क्रमांक मिळवण्याचे ध्येय साध्य करायचे आहे. पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये मिळालेल्या यशामुळे आपल्याला त्यासाठी जोमाने काम करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.स्वाती महांळकर यांनी केले. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी आभार मानले.

जर्मनीला निघालेल्या श्रावणी टोनगे हिचा सत्कार

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकणारी विद्यार्थिनी श्रावणी टोनगे हिची निवड जर्मनीतील प्रतिष्ठित युनायटेड वर्ल्ड कॉलेज (UWC) संस्थेच्या रॉबर्ट बॉश कॉलेजमध्ये झाली आहे. येत्या २८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात श्रावणीचा प्रवेश निश्चित झाला आहे

स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये योगदान देणाऱ्यांचा सन्मान

स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ च्या यशस्वी कामगिरीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, महापालिका अधिकारी-कर्मचारी आदींचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. या सहभागाबद्दल प्रतिनिधिक स्वरूपात त्यांचा सन्मान देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

यामध्ये सफाई सेविका अनुसया वाकचौरे, वैशाली मारणे, सफाई सेवक शिवानंद मोची, लक्ष्मण पांचाळ, गंगा वाघमारे, मंगेश रघुराव, दीपक शिंदे, सीताराम दाते, कचरा संकलन वाहक चालक राजू देवकर, निलेश कांबळे, आयईसी सदस्य अनिकेत पवार, शुभांगी राठोड, योगीता ढाकरे, सुखदेव लोखंडे, अनिलकुमार पाटील, सुरेखा इंगळे, रोहन वडमारे, कुशल मोरे, स्वच्छता दूत पूजा शेलार, सुरेखा डोळस, संगीता जोशी, अदिती निकम, यशवंत कन्हेरे, आर.जे. बंड्या, ईशिता बारवाड, नवी दिशा महिला बहुउद्देशीय मंडळ, वैष्णवी बचत गट, महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, अश्विनी गायकवाड, अजिंक्य येळे, अमित पंडित, तानाजी नरळे, अतुल पाटील, किशोर ननवरे, पूजा दुधनाळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, अंकुश झिटे, सुधीर वाघमारे, किशोर दरवडे, शांताराम माने, महेश आढाव, राजेश भाट, श्रीराम गायकवाड आदींचा सन्मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

याशिवाय महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता हरविंदसिंग बन्सल, सत्वशील शितोळे, अनिल भालसाखळे, जलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता विनय ओव्हाळ, राजेंद्र जावळे, प्रेरणा सिनकर, जाहिरा मोमिन, चीफ केमिस्ट उमा भोगे, उपअभियंता योगेश आल्हाट, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी शरद टंडन, चैतन्य बेर्डे, जोसे जेकब, संजू जेकब, शिजू अँटोनी, महेंद्र अनंथुला, ब्रिजेश कुमार, अनिकेत जाधव, रोहित आपटे, प्रकाश संचानिया आदींचा सन्मान यावेळी करण्यात आला.

स्वच्छतेविषयक घोषवाक्य व मॅस्कॉट स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ च्या अनुषंगाने स्वच्छतेविषयक घोषवाक्य व मॅस्कॉट डिझाईन स्पर्धेचे आयोजन केले होते. घोषवाक्य स्पर्धेमध्ये ३४२ प्रवेशिका आल्या होत्या. या स्पर्धेत गिरीश कुटे यांनी पारितोषिक पटकावले आहे. तर मॅस्कॉट डिझाईन स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये अतुल वाघमैतर यांच्या मॅस्कॉट डिझाईनला पारितोषिक मिळाले आहे. या दोघांचा सन्मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करून त्यांना पारितोषिक देण्यात आले.

‘हरित सेतू’ प्रकल्प ब्रँड डिझाईन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित सेतू प्रकल्पाच्या अनुषंगाने असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाच्या सहकार्याने ब्रँड डिझाईन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक ३ लाख रुपये हे प्रज्ज्वल जयसिंग दिंडे यांनी, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक २ लाख रुपये रोहित राजेंद्र घोडके यांनी आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रत्येकी ५० हजार रुपये अमोल सोनू दर्डी व शौर्य भारद्वाज यांनी मिळवले आहे. तसेच विशेष ज्युरी पारितोषिक नासीर मेहबूब शेख यांनी पटकावले आहे. या सर्व विजेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिकाची रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे महापालिकेचे सह शहर अभियंता बापू गायकवाड, स्पर्धेचे ज्युरी हेड आश्विनी देशपांडे, आयटीडीपीच्या काश्मिरा मेढोरा, पीडीएचे प्रसन्ना देसाई, असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाचे रंजना दाणी, पौर्णिमा भुरटे, चंद्रशेखर बडवे, ऋग्वेद देशपांडे यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.

जनता संपर्क अधिकारी

Follow Us On