Team My Pune City –विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगासोबत बैठक झाल्यानंतर एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेवर टीका केली.या पत्रकार परिषदेत बोलत असताना राज ठाकरेंनी अजित पवारांची मिमिक्री केली. याबाबत अजित पवारांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं.
काल पत्रकार परिषदेत राज ठाकरेंना तुम्ही महाविकास आघाडी सोबत एकत्र दिसत आहात याबद्दल प्रश्न विचारला होता, त्याचे उत्तर देतांना ते म्हणाले, ‘2017 साली सुद्धा मी विरोधकांनसोबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळेस सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा होते. खरंतर त्यांनी सुद्धा आज यायला पाहिजे होतं. त्यावेळेला ते तावातावाने बोलत पण होते’, असं म्हणताना राज ठाकरे यांनी अजित पवारांची मिमिक्री केली. आता राज ठाकरे यांच्या या मिमिक्रीवर स्वतः अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Ajit Pawar: शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळणार-अजित पवार
Maval: मावळचे भजनसम्राट ह.भ.प. नंदकुमार शेटे महाराज यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मान
अजित पवार पुण्यात आहेत . आज माध्यमांशी बोलत होते त्यावेळी एका पत्रकाराने राज ठाकरे यांनी तुमची मिमिक्री केली? असा प्रश्न अजित पवार यांना विचारला.याचे उत्तर देतांना ते म्हणाले,
हे बघा मला कुणीही मिमिक्री केली तरीही माझ्या अंगाला काही भोकं पडत नाहीत. “उद्या तू जरी माझी मिमिक्री केली तरी माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत. मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील. मी काम करणारा माणूस आहे मी काम करत राहील. मी आज शेतकऱ्यांकरता महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.”
“मिमिक्री कोण करतंय हे आपण ओळखून घेतलं पाहिजे. उद्या तुम्ही उठून त्यांना विचारणार का ओ राजसाहेब ठाकरे तुम्ही मिमिक्री केल्यावर अजित पवार असं-असं म्हणाले. मला याच्याशी घेणं देणं नाही. मला माझ्या बळीराजाला दिवाळीच्या पूर्वी ताबडतोब कशी मदत मिळेल, शेतकऱ्यांना पुन्हा कसं उभं करता येईल हे पाहायचं आहे. हे काम आम्ही करत आहोत आणि ते करत राहू”, असा अजित पवार मानले .