situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ajit Pawar: हिंजवडीच्या विकासकामात अडथळे आणणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करा- अजित पवार यांचा स्पष्ट इशारा

Published On:
Ashtavinayaka

Team My Pune City – राजीव गांधी आयटी पार्क तसेच(Ajit Pawar) हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील वाहतूक कोंडी आणि पावसाळी पाणी निचऱ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नाइलाजाने कठोर निर्णय घेण्याची वेळ आली असून, या विकासकामांना कोणी अडथळा आणल्यास त्यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करा, असा थेट आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना दिला आहे.

हिंजवडी परिसरातील पाहणी केल्यानंतर आकुर्डीतील पीएमआरडीए कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत पवार यांनी स्पष्ट केले की, “विकासाच्या कामात कोणी विनाकारण अडथळा निर्माण केला, तर त्याच्यावर कलम 356 अंतर्गत गुन्हा दाखल करा.”

Indrayani River : इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ; भक्ती सोपान पुलावरून पाणी

Alandi: वै. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर स्मारकाजवळील अतिक्रमण हटविणे बाबत आळंदी नगरपरिषदेस निवेदन

रस्ते रुंदीकरणाच्या कामात अनधिकृत बांधकामे हटवली जातील आणि अधिकृत बांधकामांवर अन्याय होणार नाही याची ग्वाहीही त्यांनी दिली. अशा बांधकामांना टीडीआर अथवा रोख स्वरूपात मोबदला देण्याची तयारी शासनाने दाखवली आहे.

या परिसरातील पावसाळी पाणी वाहून नेण्याची व्यवस्था, वाहतूक सुधारणा, रस्ते रुंदीकरण यासाठी पुणे महापालिका, पीसीएमसी, पीएमआरडीए, एमआयडीसी, महावितरण, मेट्रो आदी संस्थांना विश्वासात घेऊन समन्वय साधला जात आहे. काही नागरिक समाधान व्यक्त करत असतानाच, काहींनी नाराजी दर्शवली असून, उर्वरित अतिक्रमणे हटवण्याचे काम सुरू असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

“कोणालाही विनाकारण त्रास न होता, कायदेशीर आणि विकासाभिमुख मार्गाने निर्णय घेणार आहोत. मात्र गरज पडल्यास कठोर निर्णय घ्यावेच लागतील,” असे पवार यांनी पत्रकार परिषदेत ठामपणे सांगितले.

चाकण परिसराला ही भेट देणार

चाकण परिसरात देखील वाहतूककोंडी होत असून लवकरच त्या भागाची पाहणी करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

Follow Us On