Team My Pune City – वंचित व उपेक्षित मुलांच्या शिक्षणासाठी (Ajit Foundation)समर्पितपणे कार्यरत असलेल्या अजित फाऊंडेशन या संस्थेला नुकतीच विवो इंडिया कंपनीच्या वतीने सीएसआर निधीतून किरणा साहित्याची भरीव मदत मिळाली. यासाठी उर्मी संस्था, पुणे यांनी विशेष पुढाकार घेतला. यासाठी हिसोआ इलेक्ट्रानिक या कंपनीनेच सचिव सदाशिव चव्हाण, व्यवस्थापक रोहित वाळके, एचआर प्रमुख सौम्या बक्षी, उर्मी संस्थेचे अध्यक्ष राहुल शेंडे, राहुल चुनीदास व दिलीप तिडके उपस्थित होते.
वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित समाजघटकांच्या उत्थानासाठी शिक्षण, स्वावलंबन आणि सक्षमीकरणाची लढाई लढणारे दांपत्य म्हणजे विनया आणि महेश निंबाळकर यांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक पदाची नोकरी सोडून संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेतले. अजित फाऊंडेशन मागील १८ वर्षांपासून वंचित व उपेक्षित शाळाबाहय मुलांसाठी कार्य करत मुलांना निवासी शिक्षण व संगोपनासह लोकशाहीचे धडे दिले जातात. ज्यातून मुले उत्तम व जबाबदार नागरिक होतील, यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. अजित फाऊंडेशन ही केवळ सामाजिक संस्था नाही, तर एक प्रेरणादायी सामाजिक प्रयोगशाळा आहे.
याच कार्याची दखल घेत उर्मी संस्थेच्या पुढाकारातून व विवो इंडियाच्या सहकार्यातून अजित फाऊंडेशला मदत केल्याचे राहुल शेंडे यांनी सांगितले.
Firing : जमिनीच्या वादातून भावावर गोळीबार
Suicide : ब्लॅकमेलिंगला कंटाळून 22 वर्षीय तरुणीची आत्महत्या आरोपी अटकेत, वडगाव मावळ येथील धक्कादायक प्रकार
यावेळी अजित फाऊंडेशनवतीने. CSR कार्यक्रमांतर्गत अशा ग्रामीण भागातील उपेक्षित विद्यार्थ्यांपर्यंत मदतीचा हात पोहोचवणाऱ्या कंपनीचे व उर्मी संस्थेचे विशेष कौतुक करण्यात आले. या मदतीबद्दल अजित फाऊंडेशनच्या वतीने सर्व प्रतिनिधींनी मन:पूर्वक आभार मानले असून पुढील काळात असे सहकार्य टिकून राहील, अशी अपेक्षा संस्थापक महेश निंबाळकर यांनी व्यक्त केली.