Team MyPuneCity – आज सकाळी आद्य रामायणकार महर्षी वाल्मिक यांच्या वाल्हे नगरीतून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा लोणंदकडे मार्गस्थ झाला .सकाळचा विसावा पिंपरे खुर्द येथे घेऊन नीरा नगरीकडे नीरा नदीतील शाही स्नानासाठी मार्गस्थ(Aashadhi Wari Sohala) झाला.
फुलांनी सजविण्यात आलेल्या माऊलींच्या पालखीतून श्रींच्या पादुका घेण्यात आल्या. माऊली माऊली नामाचा जयघोष करत,टाळ मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात आज माऊलींच्या पादुकांना शाहीस्नान घालण्यात आले.नीरा स्नानानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आपल्या वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप घेत, सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. आज पालखी सोहळा लोणंद मुक्कामी (Aashadhi Wari Sohala)असणार आहे.
Pune : गीत, संगीत आणि नृत्याविष्कार असलेल्या तालयात्रेच्या बरसातीने रसिक चिंब
पंढरीच्या दिशेने लाखो वारकरी भाविक चालत आहेत.ही पंढरीची वाट वैष्णवांनी फुलून गेली आहे. कपाळी गोपीचंदाचा टिळा, खांद्यावर भगवी पताका, गळ्यात तुळशीची माळ, डोक्यावर तुळशीचे वृंदावन, टाळ-चिपळ्या मृदंगाच्या साथीने, मुखातून होत असलेला विठूनामाचा गजर असे चित्र वारीच्या वाटेवर दिसून येत आहे. वारीत ऐंशी नव्वद वर्षांच्यावरील वारकरी भाविक पायी चालत असुन ते सर्वांचे (Aashadhi Wari Sohala)लक्ष वेधून घेत आहेत.
Vadgaon Maval : पोल्ट्री योद्धा संघटनेच्या अध्यक्षपदी एकनाथ गाडे तर कार्याध्यक्षपदी सुभाष केदारी
सोशल मीडियाच्या मध्यमातून अनेक व्हिडीओ त्यांचे व्हायरलं होत आहेत.लाखों लोकांच्या पसंतीस ते पडतं आहेत.काहींच शरीर थकलं असलं तरी मन थकले नाही.माऊलींच्या कृपेने ,नामस्मरणाने पंढरीच्या दिशेने ते वाटचाल करत आहेत. तर कोणी या वारीत आपल्या आई साठी श्रावण बाळ होऊन वृद्ध आईस रथगाडीत बसवून ओढत,ढकलत पंढरीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
तसेच लहान मुले ,तरुणाई ,ज्येष्ठ सुद्धा या वारीत हरिनामात दंग होत विविध खेळ खेळत, नृत्य करत आहेत. लहानांपासून ते ज्येष्ठापर्यंत असणारे वारकरी भाविक या वारीत उत्साही दिसून येत आहेत. रात्री हरिकीर्तनात ,भजनात दंग होत आहेत. अश्या भक्तिमय वातावरणात सर्व दिंड्या पंढरीच्या वाटेने मार्गस्थ होत (Aashadhi Wari Sohala) आहेत.