Team My Pune City – वारीसाठी पंढरपूरला हजारो वारकरी पायी चालत जातात. ऊन, वारा,पाऊसझेलत काट्या कुट्यातून,चिखलातून माऊलीचा गजर करत पंढरीच्या वारीला वारकरी निघतो. यंदा महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वारीत कोणत्याही प्रकारच्या अपघातात वारकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत मिळणार आहे. सरकारकडून वारकऱ्याच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे .यासंदर्भातलं नवं परिपत्रक महसूल विभागाने आज जाहीर केला आहे .
या निर्णयामुळे वारीदरम्यान घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमध्ये वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळणार आहे. 16 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत वारीदरम्यान जर एखाद्या वारकऱ्याचा अपघात, विषबाधा किंवा इतर नैसर्गिक कारणामुळे मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबीयांना ही रक्कम मिळणार आहे. मात्र आत्महत्येच्या घटनांमध्ये ही मदत लागू होणार नाही. याशिवाय, वारीदरम्यान अपघातामुळे अपंगत्व आल्यास देखील आर्थिक मदतीची तरतूद आहे.
मदतीची तरतूद पुढील प्रमाणे –
अपघाताने व दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यावारकऱ्याच्या वारसदारांस 4 लाखांची मदत
वारीदरम्यान अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांना 74,000 ते 62.50 लाख पर्यंत मदत
एका आठवड्यापेक्षा अधिक काळ दवाखान्यात दाखल झाल्यास 16000 रुपये तर एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी दाखल असल्यास 5400 रुपयांची मदत मिळणार .
महसूल विभागाच्या नव्या परिपत्रकानुसार, विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरता वारी सुरू झाल्याच्या दिनांक पासून म्हणजेच 16 जून ते 10 जुलैदरम्यान, अपघाताने मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी मदतीची तरतूद करण्यात आली आहे.