Team My pune city राज्यातील वाढत्या मुस्लिम व अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. ८ जुलै २०२५ रोजी इस्लाम जिमखाना , नरिमन पॉईंट या ठिकाणी सकाळी ११ वा. गोलमेज परिषदेचे आयोजन केलेले आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी राज्यातील जवळपास सर्वच मुस्लिम आमदार व धर्मनिरपेक्ष विचारांचे अन्य आमदार पहिल्यांदाच एकाच विचारमंचावर येणार आहेत.
मुस्लिम धार्मिक स्थळांवरील एकतर्फी कारवाई, लव जिहादच्या नावाखालचा हिंसाचार, मोब लिंचींग, धार्मिक ध्रुवीकरण व द्वेष पूर्ण भाषण यावर विचार विनिमय करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी कळविले आहे.
Talegaon Dabhade Crime News : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक
Mahatma Gandhi statue : पुण्यात एका तरुणाकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेसकडून पुतळ्याला दुग्धभिषेक
नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर,अहिल्यानगर, पुणे आणि कोल्हापूर यासह राज्यातील विविध भागातील अत्याचार पीडित मुस्लिम समुदायाची प्रतिनिधी मंडळ परिषदेत सहभागी होणार आहेत. माजी पोलिस महानिरिक्षक अब्दुर रहमान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी माजी मंत्री नवाब मलिक, आरीफ नसीम खान, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, आमदार अबू आझमी, असलम शेख, अमीन पटेल, डॉ. सिध्दार्थ धेंडे , मुफ्ती इस्माईल, रईस शेख, हारून खान, साजिद खान, सना मलिक, माजी आमदार वारीस पठाण, वजाहत मिर्झा, युसूफ अब्रहानी , इत्यादी आमदार व रशिद शेख , ॲड. अय्युब शेख , सुवर्णा डंबाळे, लुकस केदारी , सहभागी होणार आहेत.
सदर कार्यक्रमाचे संयोजन नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे जावेद शेख , मुजमीन शेख , सिकंदर मुलानी , डॉ. परवेज अश्रफी , शहाबुद्दीन शेख , सलीम पटेल . राहुल नागटिळक आदी मान्यवरांकडून करण्यात आले आहे