Team My pune city –पावसामुळे आळंदी शहरात पुन्हा ठिक ठिकाणी खड्डे पडले आहेत.यातच आळंदी नगर परिषद कमान समोरील रस्त्यावर खड्डा पडला असून कोणत्या तरी नागरिकाने त्या खड्ड्याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यात दगडी टाकून झाडाची फांदी त्यात लावली आहे.
रस्त्याच्या मधोमध खड्डा असल्याने रहदारी करताना वाहनांना अडथळा होतो तसेच खड्ड्यात पाणी साचल्याने वाहने आदळतात.हे पाहता ते कृत्य केल्याचे दिसून येत आहे.
आळंदी नगरपरिषद चौक,व तिच्या कमानी समोरच असे कार्य केल्याने शहरातील खड्ड्यांबाबत चर्चा होत आहे.

शहरातील खड्डे बुजून सुद्धा पुन्हा त्याच ठिकाणी पावसामुळे खड्डे पडत आहेत.त्या खड्ड्यांचा अडसर वाहनांच्या रहदारीस होत आहे.शहरातील खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी ते बुजवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Maitri Foundation : आषाढी एकादशीच्या पावन दिवशी ‘मैत्री फाऊंडेशन’चा जन्म – एक हात मैत्रीचा, समाजासाठी!
Mahatma Gandhi statue : पुण्यात एका तरुणाकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेसकडून पुतळ्याला दुग्धभिषेक
माऊलींचा पालखी सोहळा आषाढी वारी निमित्त शहरातील खड्डे बुजवण्यात आले.आणि पुन्हा पावसामुळे त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडत आहेत.