situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: मुंबईत मराठी का टिकवता आली नाही-भाजप खासदार मेधा कुलकर्णी

Published On:

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मेधा कुलकर्णी यांचा सवाल

Team My Pune City –राज्यात हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या मुद्यांवरून गेल्या काही दिवसांपासून चांगलंच राजकारण तापलं होतं. अखेर हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्यावतीने आज मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईच्या वरळीतील डोम या ठिकाणी ठाकरे बंधूंचा हा मेळावा पार पडला आहे. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेला प्रत्युत्तर देत थेट इशारा दिला आहे.

आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाट होता, तो अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला : उद्धव ठाकरे

राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात अप्रतिम मांडणी केली आहे.आजच्या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे.एक गोष्ट महत्वाची आहे की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाट होता तो अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला.आता अक्षदा टाकण्याची काही आवश्यकता नाही. एकत्र आलो आहेत ते एकत्र राहण्यासाठी,मला कल्पना आहे की, आता अनेक बुवा, महाराज हे व्यस्त आहेत.कोणी गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल, त्या सर्वांना सांगतो आम्ही तुमच्या पुढे उभे ठाकलेलो आहोत”,अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.या टिकेनंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

मुंबईत मराठी का टिकवता आली नाही : भाजप खासदार मेधा कुलकर्णी

त्याच दरम्यान पुण्यातील भाजपच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्याशी आजच्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणा बाबत विचारले असता त्या म्हणाल्या,उद्धव ठाकरे यांची विधान सुरुवातीपासून त्रासदायक आणि जातीवाचक राहिली आहेत.हिंदी भाषेच्या मुद्यावर ते एकत्रित आल्याची भाषा करीत आहेत.त्या सर्वांची मुले इंग्रजी माध्यमांमध्ये शिकली आहेत.हे राज्यातील जनतेच्या समोर आले आहे.

तसेच मागील अनेक वर्षांपासून ते मुंबईच प्रतिनिधित्व करतात,ज्या मुंबईची सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये आहे.त्या मुंबईमध्ये मराठी का टिकविता आली नाही,असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

Alandi :देवशयनी आषाढी एकादशी निमित्त माऊली मंदिरात भाविकांची गर्दी

Vadgaon:वडगाव शहर भाजयुमो अध्यक्ष आतिश ढोरे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

तसेच त्या पुढे म्हणाल्या,कधी मद्रासी,कधी बिहारी,तर कधी गुजरातीच्या विरोधात नारा देण्याच काम त्यांनी केल.पण आज मुंबईत बरेचसे गुजराती,मद्रासी यांनी हॉटेल्स घेतलेले आहेत.त्या अनेक ठिकाणी बिहारी काम करतात,मात्र महाराष्ट्रातील लोकांना मराठी आणि महाराष्ट्र हे मुद्दे उपस्थित करून येथील लोकांना नादी लावायाच,काम त्यांनी केल आहे.त्यामुळे आज मराठी युवक रोजगारापासून वंचित राहिलेला आहे.केवळ भावना भडकवण्याच्या कामगिरीशिवाय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीही जमलेल नाही.त्यामुळे राज्यातील जनतेने त्यांच नेतृत्व नाकारलेल आहे.यामुळे त्यांना एकत्र येण्याची आवश्यकता भासली, एकत्रित येऊन कोणताही मुद्दा उपस्थित केला.तरी देखील महाराष्ट्र त्याची दखल घेणार नाही आणि आगामी निवडणुकीत त्यांच खात देखील उघडल जाणार नाही.त्या सर्वांची डिपॉझिट जप्त होतील,अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली.

Follow Us On