Team My Pune City –देवशयनी आषाढी एकादशी निमित्त माऊली मंदिरात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासूनच मोठी गर्दी केली होती.मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असल्याने स्काय वॉक पुल मार्गे पान दरवाजातून व महाद्वार येथून दर्शनाची आज सकाळी रांग होती.
Pavana Dam : पवना धरणातून 400 क्युसेक्स विसर्ग सुरू; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
काळा मारुती येथील द्वारातून भाविकांना मंदिरा बाहेर जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.एकादशी निमित्त मंदिरात भाविकांना उपवासाच्या प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. इंद्रायणी घाटावर भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली होती. इंद्रायणी घाट भाविकांनी फुलून गेला होता.तसेच मंदिर परिसर ही भाविकांनी फुलून गेला होता.एकादशी निमित्त माऊलीं मंदिरात आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली होती.
संततधार होत असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीपात्रातील पाण्यात वाढ झाल्याने त्रिवेणी भागीरथी कुंड पाण्याखाली होते.त्याच्या वरील दगडी घाटावर नदीपात्रातील पाणी आले होते. आळंदी नगरपरिषद व आळंदी पोलीस स्टेशनचे कर्मचारी इंद्रायणी घाटावर तैनात होते.तसेच मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.आज एकादशी निमित्त माऊलींची पालखीची हरिनाम गजरात नगर प्रदक्षिणा होणार आहे.
Alandi :देवशयनी आषाढी एकादशी निमित्त माऊली मंदिरात भाविकांची गर्दी
