Team My Pune City – पुण्याच्या झपाट्याने विकसित होत असलेल्या पश्चिम भागात – विशेषतः वाकड, बालेवाडी, हिंजवडी, म्हाळुंगे, रावेत, बाणेर, औंध या परिसरात – सार्वजनिक ट्रान्झिट हब/बस स्थानकाची तातडीने गरज असल्याची मागणी FITE Forum व आयटी कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
FITE Forum च्या वतीने पाठविण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले की, या भागात लाखो आयटी कर्मचारी, विद्यार्थी, कामगार व विविध जिल्ह्यांतून आलेले नागरिक राहत असून, सध्या त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी महामार्गावर किंवा उड्डाणपूलाखाली उभे राहून बसेस पकडाव्या लागतात. यामुळे नागरिकांना अपुऱ्या सुविधा, असुरक्षितता आणि गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
Pune:दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे जिल्हास्तरीय ‘अमृतप्रभा समूहगान’ स्पर्धेचे आयोजन
या ट्रान्झिट हबमुळे हिंजवडी आयटी पार्क, बाणेर हायस्ट्रीट आयटी पार्क, म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुल, तसेच वाकड, पुनावळे, पिंपळे सौदागर, सुस, बाणेर आदी भागांतील स्थानिक रहिवासी व विद्यार्थी वर्गाला मोठा दिलासा मिळेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
FITE Forum च्या मते, वाकड-बालेवाडी परिसरातील प्रस्तावित मेट्रो स्थानकांमुळे हा ट्रान्झिट हब भविष्यातही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुगम होईल. याशिवाय महामार्गावर अनधिकृतपणे थांबणाऱ्या बसेसमुळे होणारे अपघातही कमी होतील.
Pavana Dam : पवना धरणात दमदार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ – साठा 71 % वर
सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा आणि तातडीने नियोजन सुरू करावे, अशी मागणी FITE Forum आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.