Team My Pune City – दारू विक्री प्रकरणी दिघी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई गुरुवारी (3 जुलै) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास (Charholi Crime News) चऱ्होली बुद्रुक येथे केली.
सदानंद गणेश गिरे (30, भोसरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुधीर डोळस यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद (Charholi Crime News) दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सदानंद हा चऱ्होली बुद्रुक येथील काळजेवस्ती येथे एका पत्राशेड मध्ये दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पत्रा शेडमध्ये कारवाई करत सदानंद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी विदेशी दारूचा 4970 रुपये किमतीचा साठा जप्त (Charholi Crime News) केला.