Team My Pune City -महाळुंगे एमआयडीसी परिसरात सार्वजनिक रस्त्यावर जुगार खेळताना दोघांना रंगेहात पकडून अटक करण्यात आली. शुक्रवारी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील खालुंब्रे गावात ही कारवाई करण्यात आली.
आशिष जयप्रकाश ओझा (वय 26), विमल रामदेव यादव (वय 40 दोघेही रा. डी मार्टजवळ, महाळुंगे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस अंमलदार रामहरी महादेव शिंदे यांनी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pune:दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे जिल्हास्तरीय ‘अमृतप्रभा समूहगान’ स्पर्धेचे आयोजन
Pavana Dam : पवना धरणात दमदार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ – साठा 71 % वर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे ‘काळा पिवळा’ नावाचा जुगार खेळताना आढळले. त्यांच्याकडून 44 हजार 530 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.