Team My pune city – आज शनिवार दि.५ रोजी सकाळी आळंदी येथे आळंदी नगरपरिषद शिक्षण विभाग शाळा क्रमांक ४ च्या वतीने ग्रंथदिंडी, स्वच्छता व पर्यावरण दिंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शाळेतील इयत्ता १ ली ते ७ वी च्या वर्गातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी वारकरी सांप्रदायिक पोशाख परिधान करून दिंडीमध्ये सहभागी झाले होते .या विद्यार्थ्यांनी दिंडी दरम्यान मृदुंग आणि टाळाच्या ठेक्यावर वारकरी फुगडी खेळली तसेच शिक्षकवर्ग ही यात सहभागी झाले.
Uddhav Thackeray :एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच- उद्धव ठाकरे
संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा व शाळेतीळ ग्रंथ तसेच हातात स्वच्छतेविषयी व पर्यावरणाविषयी प्रबोधन करणारे फलक घेऊन हरिनामाचा जप करत विद्यार्थ्यांनी शालेय परिसरामध्ये पर्यावरण दिंडीच्या निमित्ताने प्रबोधन केले.
Pavana Dam : पवना धरणात दमदार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ – साठा 71 % वर
Raj Thackeray : जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं- राज ठाकरे


आळंदी नगरपरिषद शिक्षण विभाग शाळा क्रमांक ४ च्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय किशोर रोमन महाराज यांनी अतिशय उत्साहाने दिंडीमध्ये सहभाग घेऊन आपल्या मधुर आवाजात गायन करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला . तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे इतर सदस्य मोठ्या उत्साहाने दिंडीमध्ये सहभागी झाले. शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ ॲड. सौरभ गव्हाणे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सुनिता तापकीर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी योग्य नियोजन करून ग्रंथदिंडी यशस्वीपणे पार पाडली.