Team My Pune City -आळंदी येथील ग्रामीण रुग्णालया कडे जाणाऱ्या रस्त्यावर भाजी व इतर विक्रेते यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तेथील रस्त्यावर विक्रेते दुतर्फा बसत असल्याने रस्ता अरुंद पडून रुग्णवाहिकेस ग्रामीण रुग्णालयात ये जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे.
याबाबत चे वृत्त काल दि.३ रोजी प्रसारीत झाले होते.तसेच या वृत्ता त्या संदर्भात सोशल मीडियावर चर्चा देखील सुरू होती. याची दखल पालिकेने घेत आज तेथील रस्त्यावरील विक्रेत्यांवर कारवाई करत रस्ता पूर्ण मोकळा केला.परंतु काही विक्रेत्यां वर त्याचा काहीच परिणाम झालेला दिसून येत नाही.त्या अतिक्रमण कारवाई नंतर काही हातगाडी वर फळ भाजी व इतर विक्रेते पुन्हा दिसून आले.पालिकेच्या कारवाईचा धाक त्यांना उरला की नाही ? याबाबत शंका उपस्थित रहात आहे.
कायम स्वरूपी आळंदी ग्रामीण रुग्णालय रस्ता वर भाजी विक्रेते व इतर विक्रेते बसू नये यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून कालच्या वृत्ता नंतर चर्चा झाली.आळंदी ग्रामीण रुग्णालय रस्त्यावर भाजी विक्रेते व इतर विक्रेते बसू नये यासाठी पालिकेने कायम स्वरूपी लक्ष देणे गरजेचे आहे.अशी मागणी आळंदीकर नागरिकांकडून झाली.
आळंदीकर नागरिकांची प्रतिक्रिया

अपघात झाल्यानंतर रुग्णालयात आणण्यासाठी किंवा ग्रामीण रुग्णालयातून कधी तत्काळ रुग्णांना बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये अधिकच्या उपचारासाठी नेण्यात येते तेव्हा त्यासाठी येथील रस्तावर भाजी विक्रेते व इतर विक्रेते बसता कामा नये.असे मत माऊलीं घुंडरे यांनी मांडले.
मुख्याधिकाऱ्यांनी गंभीररीत्या सदर गोष्टीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा अन्यथा स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. असे मत संदीप रंधवे यांनी मांडले.
आळंदीत वाढलेली गर्दी बघता अजून दोन ठिकाणी भाजी मंडई झाली पाहिजे म्हणजे एकच ठिकाणी जास्त गर्दी नको.असे मत रोहन कुऱ्हाडे यांनी मांडले.