Team My Pune City – पिंपरी येथे होणाऱ्या बाराव्या विश्वबंधुता विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, गझलकार व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी मराठी विभागप्रमुख डॉ. अविनाश सांगोलेकर यांची ( Pimpri) निवड करण्यात आली आहे.
Nigdi : निगडीच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी व इंग्रजी माध्यम शाळेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
तर स्वागताध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. पांडुरंग भोसले यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.
विश्वबंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेचे पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालय यांच्या वतीने पुढील महिन्यात पिंपरी येथे ही संमेलन पार ( Pimpri) पडणार आहे.
Lonavala Rain : लोणावळ्यात जोरदार पावसाची हजेरी; २४ तासांत १६५ मिमी पावसाची नोंद, नदी-नाल्यांना पूर
डॉ. सांगोलेकर यांच्या स्वलिखित 15 आणि संपादित 12 अशा 27 साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. त्यातील ‘मराठी गझल: 1920 ते 1985 ‘, ‘दलित साहित्यः प्रवाह आणि प्रकार’ या विशेष लोकप्रिय झाल्या आहेत. डॉ. भोसले हे गेल्या 35 वर्षांपासून रयत सेवक म्हणून कार्यरत आहेत. 26 पुस्तकाचे त्यांनी संपादन केले आहे. तसेच त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रात सहभागी होऊन 43 शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या काव्य व लेखणीला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात ( Pimpri) आले आहे.