Team My pune city – मंगळवारी ( दि. १ जुलै २०२५ रोजी ) निगडी (Nigdi)येथील शि.प्र. मंडळीच्या मराठी व इंग्रजी माध्यम शाळांच्या वर्धापन दिन सप्ताहाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी चिंचवड नरेंद्र पेंडसे, वनवासी कल्याण आश्रम पिंपरी चिंचवड जिल्हा सहसचिव .विदुला पेंडसे, शाळा समिती अध्यक्ष ॲड दामोदरजी भंडारी मुख्याध्यापिका सौ. पल्लवी शानभाग ( इंग्रजी माध्यम), मुख्याध्यापिका सौ. सविता बिराजदार (मराठी माध्यम) उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून गुरु शंकराचार्य व स्वामी विवेकानंद याच्या गोष्टीतून कर्तव्य बोध, मैत्री बोध व क्षमता विकास याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उद्घाटन दिनाचे व आषाढी वारीचे औचित्य साधून शाळेतील (Nigdi) विद्यार्थ्यांकडून तुळशीचे रोप लावणे उपक्रम,चित्रकला व पोस्टर बनवणे स्पर्धा याचे आयोजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा आमची सुंदर छान शालेय गीत गायले. दि. २ जुलै रोजी शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी यांच्यासाठी योग प्राणायाम आणि ध्यान या विषयावर सौ.अंजली भाटिया याच्या कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले आहे. तसेच आत्मशुद्धीसाठी स्तोत्रपठण या विषयावर संस्कृत शिक्षिका सौ.मुक्ता दाभोळकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.


दि.३ जुलै रोजी पालकांसाठी चातुर्मासातील सात्विक आहार या विषयावर पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. ४ जुलै रोजी पालक आणि विद्यार्थ्यांसाठी शाळेतील शिक्षिका सौ.शोभा जोशी यांचे संत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावरील कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. दि. ५जुलै रोजी शाळेमध्ये सत्यनारायणाची महापूजा तसेच दिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी काढलेल्या विविध चित्रांचे प्रदर्शन या दिवशी शाळेत लावण्यात आले. दि.७ जुलै रोजी शाळेचा वर्धापन दिन सप्ताह समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले(Nigdi) आहे.
Lonavala Rain : लोणावळ्यात जोरदार पावसाची हजेरी; २४ तासांत १६५ मिमी पावसाची नोंद, नदी-नाल्यांना पूर
याप्रसंगी एसएससी बोर्डात शाळेमध्ये पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी रिटायर्ड जज श्रीयुत जगदीश नारायणराव शानभाग यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अश्विनी रासकर यांनी केले .पाहुणे परिचय वैभवी फडके यांनी करून दिला. शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदरजी भंडारी यांच्या संकल्पनेतून तसेच मुख्याध्यापिका सौ.सविता बिराजदार (मराठी माध्यम ), मुख्यध्यापिका सौ.पल्लवी शानभाग ( इंग्रजी माध्यम) यांच्या मार्गदर्शनाने तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सहभागातून शाळेचा वर्धापन दिन उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न (Nigdi) झाला.