Team My Pune City – कोंढवा परिसरातील ( Kondhwa Crime News) एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर कुरिअर बॉयच्या वेशात आलेल्या अज्ञात व्यक्तीने तोंडावर स्प्रे मारून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (२ जुलै) रात्री साडेसातच्या सुमारास घडली.
Pune : आज पुण्यात काही भागात पाणीपुरवठा बंद, उद्या कमी दाबाने होणार पाणीपुरवठा
त्यावेळी पीडित तरुणी घरी एकटीच होती, कारण तिचा भाऊ गावाला गेला होता. आरोपीने “कुरिअर आहे” असं सांगून सोसायटीत प्रवेश केला. तरुणीने कुरिअर नाकारल्यानंतरही, “सही आवश्यक आहे” असं सांगून तिने सेफ्टी डोअर उघडल्यानंतर आरोपीने तोंडावर स्प्रे फवारला आणि तिच्यावर अत्याचार केला.
Lonavala Rain : लोणावळ्यात जोरदार पावसाची हजेरी; २४ तासांत १६५ मिमी पावसाची नोंद, नदी-नाल्यांना पूर
घटनांनंतर आरोपीने तरुणीच्या मोबाईलवर सेल्फी काढून “मी परत येईल” असा मेसेज ठेवला. पीडितेने तत्काळ कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध ( Kondhwa Crime News) आहे.