Team My Pune city – महाराष्ट्र शासनाने दिनांक 30 जून 2025 च्या शासन निर्णया नुसार पंढरपूर मंदिर विकास आराखड्यासाठी 2025- 26 या वर्षांमध्ये 15 कोटी एवढा निधी वितरित केला आहे (Dr. Neelam Gorhe).
या निधीमधून पंढरपूर मंदिर विकास आराखडा अंतर्गत मंजूर कामावर वर होणारा खर्च करण्यासाठी मोठी संधी मिळालेली आहे. आषाढी वारीच्या काळामध्ये राज्य शासनाने हा निधी वितरित केलेला असल्यामुळे मंदिराच्या विकास कामासाठी मोठीच मदत होणार आहे.
Lonavala: लोणावळा परिसरात मंदिरातील चोरी प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर
हा निधी वितरित केल्याबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत. आणि या निधीच्या प्रभावी वापरातून सर्व वारकऱ्यांची यात्रा कालावधीमध्ये अधिकची सोय राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे, याबद्दल आनंद व्यक्त केला आहे . तसेच सर्व यंत्रणांचे आभार मानले आहेत आणि सर्व वारकऱ्यांना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.