Team My Pune City – पुण्यात भर दिवसा एका सराफ दुकानात सशस्त्र हल्ला करत दरोडा टाकण्यात आला. हा प्रकार पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील ( Pune Crime News) वडगाव बुद्रुक मध्ये गजानन ज्वेलर्स येथे मंगळवारी(दि.1) सकाळी घडला.
Pimpri Chichwad Crime News 2 July 2025: पत्नीचा गळा दाबून खून
याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्या दोन साथीदारां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक येथील गजानन ज्वेलर्स येथे आरोपींनी दुपारी दीडच्या सुमारास कोयता पेस्ट यासह प्रवेश केला यावेळी त्यांनी दुकानात हजर असलेल्या 57 वर्षीय फिर्यादी महिला यांच्या डोक्यात व दंडावर मारून त्यांना ( Pune Crime News) गंभीर जखमी केले.
तसेच पिस्तूल फिर्यादीवर रोखून दुकानातील कपाटांच्या काचा फोडून कपाटातून चार लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले. हा सर्व प्रकार भर दिवसा घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते सिंहगड रोड ( Pune Crime News) पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस इतर दोन फरार आरोपींचा शोध घेत आहेत.