Team My Pune City – शहरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर तडीपाराची कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने सराईत गुन्हेगारांविरोधात मोठी कारवाई करत दोन दिवसात सात सराईत गुन्हेगारांना तडीपार केले.
चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या तीन गुन्हेगारांना तडीपार केले आहे. स्वप्नील उर्फ अब्या संतोष भोसले (२५, चिंचवड), आदित्य बाबू आवळे (२०, चिंचवड) या दोघांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तर श्रीकांत अंकुश वाघमारे (२६, चिंचवड) याला एक वर्षासाठी तडीपार केले आहे.
Pune : अधिकाऱ्यासाठी पाच हजारांची लाच घेताना खासगी रायटर महिलेला रंगेहात अटक
निगडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या तीन गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे. अरमान उर्फ डायमंड मुन्ना खान (२३, निगडी), हृतिक अनिल जाधव (२५, दत्तवाडी, पुणे) यांना दोन वर्षांसाठी तर प्रसाद उर्फ लंब्या लक्ष्मण सुतार (२६, आकुर्डी) याला चार महिन्यांसाठी तडीपार केले आहे. दापोडी पोलीस ठाण्यातील समीर जयवंत खैरनार (२६, दापोडी) याला दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.