सरचिटणीस पदी अविनाश चिलेकर यांची निवड
Team MyPuneCity – मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी दै. ‘केसरी’चे नंदकुमार सातुर्डेकर यांची तर सरचिटणीस पदी ‘पीसीबी टुडे’चे अविनाश चिलेकर ( Marathi Journalists Association) यांची निवड झाली आहे.
Pimpri-Chinchwad Police Commissionerate : बदली झालेल्या पोलीस उपायुक्तांची नियुक्ती
मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पिंपरीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. संघाच्या उपाध्यक्षपदी मिलिंद कांबळे (दै.पुढारी) खजिनदारपदी विवेक इनामदार (माय पुणे सिटी न्यूज )यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्यांमध्ये गणेश यादव (दै.लोकसत्ता ), पंकज खोले (दै.पुढारी), मिलिंद वैद्य ( Marathi Journalists Association) यांचा समावेश आहे.