situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri-Chinchwa Crime News : गुंतवणुकीच्या बहाण्याने १.११ कोटींची फसवणूक करणाऱ्या पाच जणांना अटक

Published On:

Team My Pune City –अली एक्सप्रेस प्लॅटफॉर्मच्या नावाखाली १.११ लाख रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या पाच आरोपींना अवघ्या २४ तासात पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी नागपूर आणि पुणे शहरातून अटक केली. गुंतवणुकीवर १० ते १५ टक्के नफा मिळेल, असे सांगून खोटा इलेक्ट्रॉनिक अभिलेख तयार केला. त्याआधारे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली. फसवणूक केलेल्या रक्कम रोख स्वरूपात काढून त्याचे युएसडीटी या क्रिप्टो करन्सी मध्ये रूपांतर केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

शरद दिलीप सराफ (४८, हडपसर, पुणे), सुरज तात्याराम सायकर (२८, हडपसर, पुणे), संकेत संदीप न्हावले (२४, हडपसर, पुणे), नागेश नरसिंगराव गंगे (२८, हडपसर, पुणे), योगिराज किसन जाधव (२९, फलटण, सातारा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीला सतत फोन करून अली एक्सप्रेस या फ्लॅटफॉर्मद्वारे गुंतवणूक केल्यास १० ते १५ टक्के नफा मिळेल, असे सांगण्यात आले. फिर्यादी व्यक्तीने सुरुवातीला काही पैसे गुंतवले. त्यावर त्यांना अधिक नफा झाल्याचे दिसले. याबाबत आरोपींनी खोटा इलेक्ट्रॉनिक अभिलेख तयार केला होता. फिर्यादी व्यक्तीकडून गुंतवणूक वाढवत नेली. फिर्यादीने तब्बल एक कोटी ११ लाख १५ रुपयांची गुंतवणूक केली. त्यावर त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे दिसत होते. त्यांनी ती रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न केला असता रक्कम काढताना गव्हर्नमेंट टॅक्सेस भरावे लागतील, असे सांगून आरोपींनी पैसे अडवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी सहायक निरीक्षक प्रविण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमन, उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे यांची तीन पथके टायर केली. तपासात असे निष्पन्न झाले कि, फिर्यादी यांनी ट्रान्सफर केलेली रक्कम ए यु स्मॉल फायनान्स बँकेच्या एका खात्यातून नागपूर येथून रोख स्वरूपात काढून घेतली आहे. त्यानुसार उपनिरीक्षक सागर पोमण यांचे पथक नागपूर येथे पाठवण्यात आले. पथकाने शरद सराफ याला ताब्यात घेतले. त्याने हा गुन्हा सुरज सायकर आणि संकेत न्हावले यांच्यासोबत मिळून केल्याचे सांगितले. सुरज सायकर हा नागपूर येथे आढळून आला. तर संकेत हा पुणे येथे असल्याने उपनिरीक्षक प्रकाश कातकडे यांच्या पथकाने त्याला हडपसर येथून ताब्यात घेतले.

संकेत हा शरद सराफ, सुरज सायकर आणि योगीराज जाधव यांच्याकडून बँक अकाउंट घेऊन त्यावर फसवणुकीची रक्कम घेत असे. ती रक्कम त्यांना रोख स्वरूपात काढण्यास सांगत असे. पोलिसांनी योगीराज जाधव यालाही ताब्यात घेतले. आरोपींनी काढलेली रोख रक्कम संकेत हा नागेश गंगे याच्यासोबत मिळून युएसडीटी या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करत असे. ती क्रिप्टो करन्सी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर विकून त्याचे भारतीय चलनात पुन्हा रूपांतर करून घेत असे. या प्रक्रियेतून तो त्याच्याकडे आलेल्या मोठ्या रकमेबाबत कोणाला संशय येणार नाही, याची खात्री करत असे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, डॉ. शिवाजी पवार, डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, वैभव पाटील, प्रकाश कातकडे, विद्या पाटील, पोलीस अंमलदार महेश मोटकर, दीपक भोसले, सुभाष पाटील, सुरज शिंदे, सचिन घाडगे, अभिजित उकिरडे, कृष्णा गवळी, अतुल लोखंडे, हेमंत खरात, नितेश बिच्चेवार, माधव आरुटे, स्वप्नील खणसे, शुभांगी ढोबळे, दीपाली चव्हाण यांनी केली.

Follow Us On