situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri-Chinchwad: पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, स्वप्ना गोरे यांची बदली

Published On:

Team MyPuneCity –पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांची बदली झाली. याबाबतचे आदेश गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी दिले आहेत.

संदीप डोईफोडे यांची ऑगस्ट २०२३ मध्ये पिंपरी-चिंचवड शहरात बदली झाली होती. दरम्यान ते युसीटीसी फोर्स वन मुंबई येथे कार्यरत होते. पिंपरी-चिंचवड शहरात दोन परिमंडळांचे विभाजन करून तिसरे परिमंडळ तयार करण्यात आले. तिसऱ्या परिमंडळाचे पहिले पोलीस उपायुक्त म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेची जबाबदारी सांभाळली. त्यांची मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांची नोव्हेंबर २०२२ मध्ये पिंपरी-चिंचवड शहरात बदली झाली. दरम्यान, त्या पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथे प्राचार्य म्हणून कार्यरत होत्या. शहरात आल्यानंतर त्यांना गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली. त्या शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पहिल्या महिला पोलीस उपायुक्त ठरल्या. त्यानंतर त्यांची परिमंडळ एकची जबाबदारी देण्यात आली. गोरे यांची राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक दोन, पुणे येथे समादेशक पदी बदली झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांची पिंपरी-चिंचवड शहरात बदली झाली आहे. त्यांच्या जागी पूर्वी पिंपरी-चिंचवड मध्ये कार्यरत असलेल्या माधुरी कांगणे यांची बदली झाली आहे. नागपूर शहर येथे पोलीस उपायुक्त असलेल्या श्वेता खेडकर यांची देखील पिंपरी चिंचवड शहरात बदली झाली आहे.

Follow Us On