situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chichwad 29 June 2025: वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

Published On:

Team MyPuneCity –गर्दीचा फायदा घेत एका महिलेने वृद्धेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना शनिवारी (२८ जून) सकाळी भोसरी पीएमटी बस स्टॉपवर घडली.

याप्रकरणी २५ वर्षीय आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत तानाजी चिंतामणी पारधी (३९, दिघी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तानाजी यांची आई शनिवारी सकाळी पीएमटी बस स्टॉप येथून जात होत्या. त्यावेळी आरोपी महिलेने गर्दीचा फायदा घेत तानाजी यांच्या आईला झटका देत गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून तिथून पळ काढला.


जुन्या वादातून चौघांकडून मारहाण, दोघे गंभीर जखमी

जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या दोन मुलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत एकाच्या गळ्यावर बीअरच्या बाटलीने वार केले. ही घटना गुरुवारी (२७ जून) सायंकाळी बावधन येथील गणपती मंदिराजवळ घडली.

आर्यन पवार, गणेश पोपट अडागळे, ओंकार राजू तुपे, तन्मय ढबाले अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. अनिल सामिल टोप्पो (४६, बावधन) यांनी शनिवारी (२८ जून) बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या नात्यातील मुलगा विजय एक्के याच्यावर आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून हल्ला केला. हे पाहून फिर्यादी व त्यांची दोन्ही मुले विकास व आकाश भांडण सोडवायला गेले. त्यावेळी आरोपींनी अनिल आणि त्यांच्या मुलांना बेदम मारहाण केली. आकाश याच्या गळ्यावर फुटलेली बिअरच्या बाटलीने वार करून जखमी केले. तसेच विकासच्या डोक्यात दगड मारून जखमी करण्यात आले.


थेरगावात पार्किंगमधील चार दुचाकी पेटविल्‍या

इमारतीच्या पार्किंगमध्ये अज्ञात व्यक्तीने आग लावून चार दुचाकींना जाळल्या. ही घटना शनिवारी (२८ जून) पहाटे  थेरगाव येथील कन्हैय्या पार्क परिसरात उघडकीस आली.

या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम मनोज गायकवाड (३०, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौतम गायकवाड यांनी त्यांची दुचाकी इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. रात्रीच्या वेळी अज्ञातांनी गायकवाड यांची दुचाकी, त्यांच्या शेजारी राहणारे अवधूत राजाराम ढगे, विश्वंभर लक्ष्मण धनलोभे, रामु बाबू नावंदे यांच्या एकूण चार दुचाकींना पेटवून दिल्या. यात अंदाजे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


कत्तलीसाठी बैलांची वाहतूक; दोघांवर गुन्हा

पिकअप वाहनातून कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या दोन बैलांची वाहतूक करताना दोघांना पकडण्यात आले. ही कारवाई शनिवारी (२८ जून) दुपारी खेड तालुक्‍यातील रासे फाटा येथे केली.

गणेश येडुदास शिंदे (३०, खर्डा, जामखेड) आणि शिवाजी रामचंद्र मोरे (५२, सातेफळ, जामखेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कॉन्स्टेबल रमेश कांबळे यांनी चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी पिकअप गाडीत ४० हजार ४०० रुपयांच्या दोन बैलांना पाण्याची व चार्‍याची व्यवस्था न करता अत्यंत अमानुषरीत्या बांधून वाहतूक केली जात होती. याबाबत कोणताही परवाना वा परवानगी नसल्याचे पोलिसांच्या तपासणीत आढळून आले. आरोपी कत्तल करण्यासाठी बैलांची वाहतूक करत होते.


अंधश्रद्धेच्या आडून खासगी क्षण पाहण्याचा घृणास्पद प्रकार

मोबाईल ॲक्सेस घेऊन भक्तांचे चित्रीकरण करणाऱ्या भोंदू बाबाला बावधन पोलिसांकडून अटक

भक्तांच्या मोबाईलमध्ये गुपचूप अ‍ॅप डाऊनलोड करून मोबाईलचा अ‍ॅक्सेस घेत त्यांचे खाजगी क्षण पाहणाऱ्या आणि त्यांचे चित्रीकरण करणाऱ्या एका भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. मृत्यूची भीती दाखवत तरुण भक्तांना वेश्या किंवा प्रेयसीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास प्रवृत्त करून तो त्यांच्या हालचाली मोबाईल कॅमेऱ्याद्वारे टिपत होता. या फसवणुकीचा उलगडा एका भक्ताच्या सायबर तज्ज्ञ मित्रामुळे झाला आहे.

प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार (२९, रा. सुसगाव, मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या बाबाचे नाव आहे. याप्रकरणी एका ३९ वर्षीय भक्ताने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बाबा बावधन परिसरात श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या आडून आपली दुकानदारी चालवत होता. ‘आपल्याला दिव्यशक्तीची आत्मभूती प्राप्त झाली आहे’, असा दावा करत तो भक्तांना ‘तुमचा मृत्यू चार ते पाच महिन्यांत अटळ आहे’ असे भाकीत सांगून मानसिकदृष्ट्या कमकुवत करत होता.
यानंतर मंत्र जाप करण्याच्या बहाण्याने तो भक्तांना एकांत ठिकाणी बसवून त्यांचा मोबाईल हातात घेत. पासवर्ड विचारून मोबाईलमध्ये गुपचूप ‘एअर ड्रॉइड कीड’ हे हिडन अ‍ॅप डाऊनलोड करून ठेवत असे. हे अ‍ॅप बॅकग्राऊंडमध्ये कार्यरत राहून बाबाला संबंधित भक्तांचा कॅमेरा, आवाज, लोकेशन यावर थेट नियंत्रण मिळवून देत होते.

या अ‍ॅपच्या साहाय्याने बाबा भक्तांना फोन करून त्यांनी कोणते कपडे घातले आहेत, सध्या कुठे आहेत, त्यांनी दिवसभरात काय काय केले, याबाबत माहिती सांगत होता. यामुळे भक्तांचा त्याच्यावरील विश्वास अधिक बळकट झाला होता. या प्रकाराचा सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे, काही तरुण भक्तांनी मृत्यूपासून सुटका करून घेण्यासाठी उपाय विचारल्यावर बाबाने त्यांना “प्रेयसी किंवा वेश्या असलेल्या तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करा” असा आगळावेगळा सल्ला दिला. विशेष म्हणजे, शरीर सबंध सुरू असताना मोबाईल दिशादर्शक (नेव्हिगेशन) सुरू करून तो मोबाईल विशिष्ट कोनातून ठेवण्यास सांगत असे. त्याद्वारे मोबाईल कॅमेराच्या माध्यमातून बाबा त्यांचे खासगी क्षण पाहत आणि त्याचे चित्रीकरण करत होता.

दरम्यान, एका तरुण भक्ताचा मोबाईल सतत गरम होऊ लागल्याने त्याने तो तपासण्यासाठी आपल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या मित्राला दिला. त्या मित्राने लॅपटॉपच्या साहाय्याने मोबाईल तपासला असता त्यात एक संशयास्पद हिडन अ‍ॅप सापडले. त्याच्या मदतीने मोबाईल बाहेरून कोणीतरी ऑपरेट करत असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा संबंधित तरुणाला आठवले की, आपण मोबाईल केवळ त्या बाबाच्याच हातात दिला होता. यानंतर त्या तरुणाने इतर काही भक्तांशी संपर्क साधला असता, त्यांच्याही मोबाईलमध्ये तेच अ‍ॅप असल्याचे निष्पन्न झाले.

आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर सर्व भक्तांनी एकत्र येऊन बाबाला जाब विचारला. त्यावेळी बाबाची घाबरगुंडी उडाली आणि त्याने तक्रार न करण्याची विनंती केली. मात्र, एका तरुण भक्ताने थेट डायल ११२ क्रमांकावर कॉल करून याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन संबंधित बाबाला ताब्यात घेतले. त्यानंतर शुक्रवारी (२८ जून) रात्री बावधन पोलीस ठाण्यात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अनेक भक्तांनी आपल्यावरही अशाच प्रकारे प्रयोग झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

दरम्यान, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपी बाबाच्या मोबाईल आणि वापरलेल्या अ‍ॅपची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी भक्तांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य आढळले. त्यानुसार, बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भक्तांचे चित्रीकरण कोठे साठवले जात होते, याचा शोध घेण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात आयटी अ‍ॅक्ट आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातील विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास बावधन पोलिस करत आहेत.

Follow Us On