Team MyPuneCity –धनकवडी येथील रहिवाशी असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यां आणि प्राध्यापिका यांना परिवर्तन फाऊंडेशन, कोल्हापूर, महाराष्ट्र यांच्या वतीने “राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार २०२५” बहाल करण्यात आला.
तुम्ही तुमचे कार्य करत रहा त्याची दखल समाजाकडून/ संस्थांकडून ही घेतली जातेच याचा प्रत्यय रिता इंडिया फाउंडेशन च्या संस्थापिका डॉ. रिता शेटीया यांना त्या करत असलेले सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आणि त्यासाठी त्यांना आता पर्यंत मिळालेले ४० पेक्षा जास्त पुरस्कार यावरून सिद्ध होते.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतः डॉ. चे शिक्षण पूर्ण तर केलेच पण हे करत असतानाच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात त्यांनी स्वतः ला झोकून दिले …अगदी अलीकडे कोविड १९ च्या काळात त्यांनी रिता इंडिया फाउंडेशन च्या अंतर्गत केलेले सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. यासाठी त्यांना कोरोना योद्धा हा पुरस्कार ही मिळालेला आहे. त्यांच्या कार्यातून त्यांनी आजच्या पिढी पुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
परिवर्तन फाऊंडेशनच्या वतीने गुरुवार दिनांक २६ जून २०२५ रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त “राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार २०२५” , स्थळ राजर्षी शाहू महाराज स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे एका भव्य कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी कोल्हापुर जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, डॉ राजेंद्रसिंग वालिया, संतोष आठवले संस्थापक प्रमुख पँथर आर्मी , स्वराज्य क्रांती सेना, उमेश जामसंडेकर जेष्ट पत्रकार, जेष्ट विधिज्ञ धनंजय पठाडे, बी न्युज चे ताज मुल्लाणी, शेतमुजरांचे नेते सुरेश ससाणे कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आणि परिवर्तन फाउंडेशन चे संस्थापक अमोल कुरणे आदी मान्यवरांच्या हस्ते डॉ . रिता यांना “राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार २०२५” देऊन सन्मानित करण्यात आले.
परिवर्तन फाउंडेशन कडून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या गेल्या आणि सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.