situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Charholi : च-होली खुर्द येथील बाह्यवळण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

Published On:
Charholi

Team MyPuneCity – धानोरे फाटा वरील च-होली खुर्द,बुद्रुक बाह्यवळण मार्गावरील रस्त्यावर ठिक ठिकाणी मोठे खड्डे झाले असून ( Charholi) वाहनचालकांना त्या रस्त्यावरून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या मार्गावरून लोणीकंद फाटा, फुलगाव , वढू तुळापूर, मरकळ,सोळू , धानोरे या मार्गे तसेच च-होली बुद्रुकमार्गे( पुणे परिसरातील) रहदारी करणारी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.तसेच आळंदी परिसरातील नागरिक विविध कामानिमित्त या मार्गाचा वापर करतात.

Alandi : मंदिरात रंगला विद्यार्थ्यांच्या भक्ती भावाचा पालखी सोहळा


च- होली खुर्द,बुद्रुक बाह्यवळण मार्गावरील रस्त्यावर तसेच दोन्ही च- होली जोडणाऱ्या पुलापर्यंत या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे.च- होली खुर्द रस्त्यावर तर ठिक ठिकाणी मोठे खड्डे असून वाहने चालवणे सुद्धा कठीण होत आहे.या खड्ड्यांमुळे तिथे अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोठ्या खड्ड्यांमध्ये वाहनांची चाके आदळत आहेत . तसेच पावसामुळे झालेल्या चिखलामुळे दुचाकी वाहने घसरत ( Charholi) आहेत.

Pavana Dam : पवना धरण ५४ टक्के भरले; यंदा पावसात समाधानकारक वाढ


दुचाकी व छोट्या मोठ्या वाहनांना ते खड्डे धोकादायक ठरत आहे .पाऊस झाल्याने त्या ठिकाणच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचते .त्या रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तेथील खड्ड्यात वाहनांची चाके आदळतात.त्यामुळे वाहनांचे स्पेअर पार्ट निखळणे, ब्रेकर लायनर निकामी होणे याची शक्यता आहे. दुचाकीस्वारांना तेथून वाहन चालवण्यासाठी कसरत करावी. दुचाकी स्वारांना त्या खड्ड्यामुळे पाठीचे , मणक्याचे आजार होण्याची शक्यता आहे.यामुळे संबंधित प्रशासनाकडून त्वरित खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांडून होत ( Charholi) आहे.

Follow Us On