situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PCMC: महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून उभारलेले मोरेश्वर भोंडवे यांचे कार्यालय त्वरित पाडा – युवराज दाखले यांची आयुक्तांकडे मागणी

Updated On:

Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालकीच्या जागेवर अनधिकृतपणे बांधकाम करून आलिशान कार्यालय सुरू केल्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्या कार्यालयावर तातडीने कारवाई करण्याची मागणी शिवशाही व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रावेतमधील सेक्टर क्र. २९ परिसरात भोंडवे कॉर्नर ते जाधव वस्ती दरम्यानच्या रस्त्यालगत असलेल्या एमएसईबी प्लॉटच्या शेजारी महापालिकेची सुमारे दोन एकर जागा आहे. युवराज दाखले यांच्या मते, नगरसेवक असताना मोरेश्वर भोंडवे यांनी महापालिकेच्या कंपाउंडला भगदाड पाडून सुरुवातीला कंटेनरद्वारे कार्यालय सुरू केले आणि त्यानंतर हळूहळू पक्के बांधकाम करून तेथे मोठे कार्पोरेट ऑफिस उभारले. या कार्यालयाचा उपयोग विविध बैठका व कार्यक्रमांसाठी केला जात आहे.

Pune : ‘हिंदी भाषेची सक्ती बिनडोक व कर्मदरिद्री’; ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचा घणाघात



सदर कार्यालय उभारलेल्या जागेचे आजचे बाजारमूल्य सुमारे ७० ते ८० कोटी रुपये इतके असल्याचे दाखले यांनी निवेदनात नमूद केले आहे. इतकी महत्त्वाची शासकीय मालमत्ता अतिक्रमित करून वापरणे हे गंभीर गुन्हा असून त्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दाखले यांच्या म्हणण्यानुसार, नुकत्याच २ जून रोजी मोरेश्वर भोंडवे यांनी या जागेवर वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी भव्य मंडप उभारण्यात आला होता आणि अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. ही संपूर्ण मालमत्ता महापालिकेच्या नावावर असूनसुद्धा यावर कोणतीही कारवाई न झाल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

यासंदर्भात महापालिकेने त्वरित पुढाकार घेऊन भोंडवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अनधिकृत बांधकाम ताबडतोब पाडून टाकावे, तसेच त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा गैरवापर केल्यामुळे भविष्यातील निवडणुकीसाठी सहा वर्षे अपात्र ठरवावे, अशी ठाम मागणी युवराज दाखले यांनी केली आहे.

मोरेश्वर भोंडवे यांनी आरोप फेटाळले

संबंधित जागेवरील बांधकामाची आपला काहीही संबंध नाही. ज्येष्ठ नागरिक संघाने महापालिकेकडून परवानगी घेऊन ते बांधकाम केलेले आहे, असा दावा मोरेश्वर भोंडवे यांनी केला आहे. राजकीय सूडभावनेतून बदनामीच्या हेतूने ते आरोप करण्यात आले आहेत, असा प्रत्यारोप भोंडवे यांनी ‘माय पुणे सिटी”शी बोलताना केला.

Follow Us On