Team MyPuneCity – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते दिवंगत संदीप शेवडे यांचा नववा स्मृतिदिन शेवडे कुटुंबीय व विद्यार्थी सहयोग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. यंदा या कार्यक्रमात इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे यांचे “छत्रपती शिवाजी महाराजांची अष्टक्रांती व शिवचरित्राचे सार” या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान (Pimpri) झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायकराव थोरात होते.
Pavana Dam : पवना धरण ५४ टक्के भरले; यंदा पावसात समाधानकारक वाढ
२३ जून २०१६ रोजी संदीप शेवडे यांचे निधन झाले. २०१७ पासून दरवर्षी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सकाळी श्री समर्थ रामदास स्वामींच्या सज्जनगड समाधीस्थळी अभिषेक व प्रसाद वाटप आणि संध्याकाळी पिंपरीतील श्री संत तुकाराम मंदिरात स्मरणसभेचे आयोजन केले जाते. या दिवशी कायमस्वरूपी देणगीद्वारे सज्जनगड अभिषेक सुरू ठेवण्यात येतो.
या कार्यक्रमात सच्चिदानंद शेवडे, राजेश पांडे, दिवंगत शिरीष महाराज मोरे (देहू), प्रवीण दवणे, यजुवेंद्र महाजन आदींची व्याख्याने यापूर्वी झाली आहेत. संदीप शेवडे यांनी १९९३ मध्ये राजेश पांडे व विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विधानभवनावर झालेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या मोर्चात १००० विद्यार्थ्यांचे(Pimpri) नेतृत्व केले होते.
२०१४-१५ मध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा संत तुकाराम नगर, पिंपरी येथे मुक्कामास होता. माजी महापौर योगेश बहल व माजी नगरसेवक वसंत शेवडे यांच्या पुढाकाराने व्यवस्था झाली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी संदीप शेवडे यांनी प्रत्यक्ष नियोजन केले. दोन वर्षे तीन टन शिरा प्रसाद वाटप करण्यात आला.
गणेशोत्सवात संदीप शेवडे व संदीप जाधव यांनी सिंहगर्जना ढोल पथक सुरू केले. त्यात ८० विद्यार्थी व ४० विद्यार्थिनी वादक होते. संदीप शेवडे यांनी स्वतः २१ वेळा रक्तदान केले. दरवर्षी १००-११० जणांचे रक्तदान शिबिर आयोजित केले. शिवनेरी, लोहगड, पुरंदर, सिंहगड, रायगड येथे जाऊन शिवज्योत आणण्याचे कार्यही केले.

इंद्रायणी सहकारी बँकेच्या स्थापनेपासून संचालक, नंतर उपाध्यक्ष व एक वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांनी ट्रान्सपोर्ट व्यवसाय १९८८ मध्ये सुरू केला. पुणे–मुंबई मार्गावर जीप चालवत, नंतर भारतीय रेल्वेचे काम स्वीकारले. नागपूर, गोवा, मुंबई आदी ठिकाणी माल वाहतूक केली. ३८ ट्रक घेतले. ट्रकचालकांना बँक लोन मिळवून दिले आणि त्यांना स्वतःचे वाहन मिळवून (Pimpri) दिले.
या कार्यक्रमात अभाविपचे कार्यकर्ते, शेवडे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र व सहकारी सहभागी झाले. आयोजनात विद्यार्थी सहयोग संस्थेचे एन. डी. पाटील, साठे सर, म्हस्के सर, धनंजय चंद्रात्रेय, कृष्णा भंडलकर, सचिन बुटाला, शीतल शिंदे, ज्योती रेगे, इंद्रायणी बँकेचे अध्यक्ष ॲड. सत्यनारायण चांडक व सहकारी यांचे सहकार्य लाभले. श्री सतीश नागरगोजे, सिंहगर्जना ढोल पथकाचे संस्थापक संदीप जाधव, माजी नगरसेवक सद्गुरु कदम, सुजाता पालांडे यांचेही सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक राजश्री चिटणीस यांनी (Pimpri) केले.