Team MyPuneCity – पुणे रेल्वे स्थानकाला (Pune Railway Station) थोरले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानक असे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी महाराष्ट्र ब्राह्मण सभा, महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संस्थेने केली आहे. या मागणीस अलीकडे खासदार मेधाताई कुलकर्णी यांनीही जाहीर पाठिंबा दिला असून, त्यानंतर आता संस्थेने अधिकृत पत्राद्वारे रेल्वेमंत्र्यांना संबोधित करून हा प्रस्ताव मांडला आहे.
२५ जून २०२५ रोजी संस्थेचे प्रदेशाध्यक्ष सचिन बोधनी यांनी रेल्वे मंत्री, भारत सरकार यांना पाठवलेल्या निवेदनात, थोरले बाजीराव पेशवे यांचे पुणे शहराशी असलेले ऐतिहासिक नाते आणि राष्ट्रनिर्माणातले योगदान अधोरेखित केले आहे.
Pune : पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी महिला पोलिस अधिकाऱ्याचा केला विनयभंग
बाजीरावांचा प्रेरणादायी पराक्रम
थोरले बाजीराव पेशवे हे केवळ मराठा इतिहासातील नव्हे, तर अखिल भारतीय पातळीवरचे तेजस्वी सेनापती होते. पुणे येथून त्यांनी पेशवाई सत्तेची धुरा सांभाळत स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले. उत्तर हिंदुस्थानात मराठा सामर्थ्य नेण्यात त्यांचे भरीव योगदान राहिले. त्यांच्या कार्याची पावती म्हणून पुण्यातील रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देणे ही ऐतिहासिक कृतज्ञता ठरेल, असे संस्थेचे मत आहे.
नवीन पिढीला इतिहासाची प्रेरणा
महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या मते, पुणे रेल्वे स्थानकास बाजीराव पेशवे यांचे नाव दिल्यास, हे केवळ ऐतिहासिक वारशाचे जतन होणार नाही, तर नवीन पिढीला प्रेरणा देणारा निर्णय ठरेल. नामकरणामुळे पुणेचे ऐतिहासिक वैभव अधोरेखित होईल, असे मत निवेदनात व्यक्त करण्यात (Pune Railway Station)आले आहे.
Girish Prabhune : श्री गणेश मोफत वाचनालयात आज गिरीश प्रभुणे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार
मुख्यमंत्री फडणवीस यांनाही मागणीची प्रत
या निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आली आहे. ब्राह्मण समाजातील विचारवंत, इतिहासप्रेमी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये या मागणीला पाठिंबा वाढत असून, या प्रस्तावावर केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा संस्था व्यक्त करत (Pune Railway Station) आहे.