Team MyPuneCity – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा आळंदी ते पंढरपूर असा प्रवास सुरू आहे. यामध्ये अनेक जण (Aashadhi Wari Sohala) विविध स्वरूपांच्या सेवा वारकऱ्यांच्या करताना दिसत आहे. ज्ञानोबा तुकाराम विश्व भ्रमण दिंडी या संस्थेच्यावतीने मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा मानत वारकरी भाविकांमध्ये पांडुरंग पाहत ते मोफत प्राथमिक आरोग्य उपचार सेवा देत आहेत.या सोहळ्यात डॉक्टर राजेंद्र मोरे ,दादासाहेब करांडे,शरद बांदल ,कृष्णा आवटे ,सागर जाधव वारकरी भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत.
Talwade Murder : तळवडे हादरले! आयटी पार्क परिसरात दुहेरी हत्याकांड, ठेकेदार पोलिसांच्या ताब्यात
वारीत लाखो भाविक असतात.तसेच सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस आहेत.गर्दीतून चालताना अचानक कोणाचा धक्का लागल्याने,ठेच लागल्याने किंवा चिखल्यामुळे पाय घसरल्याने इतर कोणत्याही कारणामुळे,घटनेमुळे भाविक पडल्यास त्यांना खरचटते ,जखम होते,अश्या वेळी प्राथमिक उपचाराची गरज भासते.जखमी व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत तात्पुरती काळजी आणि इजा वाढू नये म्हणून उपाययोजना आवश्यक (Aashadhi Wari Sohala) असते .
Girish Prabhune : श्री गणेश मोफत वाचनालयात आज गिरीश प्रभुणे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार
पट्टी आणि कापूस: जखमेवर बांधण्यासाठी आणि रक्तस्त्राव थांबवण्यासाठी. निर्जंतुकीकरण द्रावण जखमेला स्वच्छ करण्यासाठी आणि संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक असते.
हेच प्राथमिक आरोग्य उपचार सेवा ते देताना दिसत आहे. या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच यावेळी दादासाहेब करांडे म्हणाले, वारकरी भाविकांमध्ये कोणी सर्दी ,थंडी ताप ,डोकेदुखी ,अंगदुखी असते आम्ही त्यांच्यासाठी सेवा म्हणून गोळ्या औषधे देत (Aashadhi Wari Sohala) आहोत.