situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Junnar: जुन्नरच्या कोकणकडा परिसरात आढळले दोघा जणांचे मृतदेह; परिसरात एकाच खळबळ

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात खोल दरीत दोघा जणांचे मृतदेह आढळले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सुमारे १२०० फूट खोल दरीत एक पुरुष आणि एक महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह आढळून आला असून ,दोघांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

मृतांमध्ये श्रीगोंद्याचे तलाठी रामचंद्र साहेबराव पारधी, वय 40 वर्ष, आणि आंबोली (ता. जुन्नर) येथील महाविद्यालयीन युवती रुपाली संतोष खुटाण यांचा समावेश आहे. याबाबत जुन्नर पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी ही माहिती दिली आहे.

मिळालेली माहिती अशी की, रामचंद्र पारधी हे मूळ दुर्गावाडीचे असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते, याबाबत त्यांच्या पत्नीने अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार देखील नोंदवली होती. याशिवाय रूपाली देखील काही दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल होता.

Bhosari : कॉलिटी सर्कल एक्सलन्स सेंटरतर्फे आयोजीत योग महोत्सव संपन्न

कोकणकडा परिसरात स्थानिक ग्रामस्थांना पांढऱ्या रंगाची कार काही दिवसांपासून उभी असल्याचे दिसले. यानंतर शोध घेतला असता, कड्याच्या टोकावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला आढळल्या. रविवार दिनांक 22 जून रोजी दाट धुके, पाऊस आणि अंधारामुळे शोधकार्य थांबले होते. परत सोमवारी 23 तारखेला सकाळी रेस्क्यू टीमने दरीत उतरून शोध घेतला. तेव्हा त्यांना रूपाली आणि रामचंद्र यांचे मृतदेह आढळले. त्यानंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

जुन्नर रेस्क्यू टीमच्या रूपेश जगताप, राजकुमार चव्हाण, आणि पोलिस कर्मचारी रघुनाथ शिंदे, गणेश शिंदे, दादा पावडे यांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी श्री शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात पाठवले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृत्यूचे कारण अस्पष्ट असून आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास जुन्नर पोलिस करत आहेत.

Follow Us On