Team MyPuneCity – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळातील विविध योजनांचा आढावा घेणाऱ्या ‘मोदी @11 – विकसित भारताचा ( Modi@11) अमृत काळ: सेवा, सुशासन, गरीब कल्याण’ या तीन दिवसीय प्रदर्शनात सादर करण्यात आलेल्या माहितीच्या वस्तुनिष्ठतेबाबत लेखी खुलासाची अधिकृत मागणी करण्यात आली आहे. ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समूहाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सरदार रवींद्र सिंह यांनी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांना पत्र पाठवून ही माहिती तात्काळ सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.
निगडीतील ग. दि. माडगूळकर प्रेक्षागृहात नुकतेच पार पडलेल्या या प्रदर्शानात केंद्र शासनाच्या २०१४ पासून आजवरच्या विकासकामांचा, योजनांचा आणि धोरणांचा आढावा घेण्यात आला. मात्र, या सादरीकरणातील आकडेवारी, माहितीफलक, फ्लेक्स, संदर्भ, वापरलेला निधी व खर्च याबाबत पारदर्शकता नसल्याचा मुद्दा उपस्थित करत सरदार रवींद्र सिंह ( Modi@11) यांनी सविस्तर लेखी माहितीची विनंती केली आहे.
Pune: रसिकांची दाद कलाकारांना सुखावते – पं. सुहास व्यास
मागणीचे ठळक मुद्दे:
- प्रदर्शनात सादर करण्यात आलेल्या योजनांची व प्रकल्पांची अधिकृत यादी
- वापरलेली आकडेवारी कोणत्या शासकीय दस्तावेजांवर आधारित आहे, याचा उल्लेख
- फ्लेक्स, पोस्टर्स व माहितीफलकांचे संदर्भ व नमुने
- या कार्यक्रमासाठी वापरलेला निधी, त्याचा स्रोत व एकूण खर्च
- आयोजनामागील उद्देश व माहितीची वस्तुनिष्ठता स्पष्ट करणारे लेखी दस्तावेज
या उपक्रमामागे निव्वळ प्रचारात्मक हेतू न ठेवता, तो जनतेसाठी माहितीपूर्ण व पारदर्शक व्हावा, हीच या मागणीमागची भूमिका असल्याचे रवींद्र सिंह यांनी स्पष्ट( Modi@11) केले.
Pavana Dam : पवना धरण ४८ टक्के भरले; मावळ परिसरात दमदार पाऊस
ते पुढे म्हणाले, “सामान्य नागरिक, अभ्यासक व सामाजिक संस्थांना केंद्र शासनाच्या कामगिरीबाबत वस्तुनिष्ठ माहिती मिळणे, हा लोकशाहीतील मूलभूत हक्क आहे. म्हणूनच ‘मोदी@11’सारख्या उपक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकाची सुस्पष्ट माहिती लेखी स्वरूपात उपलब्ध व्हावी.”
पक्षीय प्रचाराची माध्यमं म्हणून अशा प्रदर्शनांचा वापर होऊ नये, तर नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराचा सन्मान राखून, जनजागृतीचे साधन ठरावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शहर भाजप अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना सादर केलेल्या या पत्राद्वारे, सरदार सिंह यांनी प्रदर्शनाच्या सर्व अंगांची माहिती उघड करण्याची विनंती केली ( Modi@11) आहे.