Team MyPuneCity – कंपनीतील लाखो रुपये किमतीचे पार्ट चोरून नेताना तिघांना पकडण्यात आले. दरम्यान एकजण पळून गेला. ही घटना रविवारी (२२ जून) रात्री सी बर्ड लॉजी सोल्युशन कंपनी, महाळुंगे येथे ( Pimpri Chichwad Crime News 23 June 2025) घडली.
ओंकार खंडू जाधव (२४), दिनेश बंडू लष्करे (२७, मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह सोमनाथ जगताप (मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जोगिंदर रामप्रकाश सिंग (५५, रहाटणी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तिघेजण महाळुंगे येथील सी बर्ड लॉजी सोल्युशन कंपनीत एका वाहनावर काम करत होते. त्यांनी कंपनीतून दुचाकी वाहनाचे एक लाख ७० हजार १०० रुपये किमतीचे ४१७ पार्ट चोरून त्यांच्या ताब्यातील वाहनात भरले. हे पार्ट चोरून नेत असताना त्यांच्या वाहनाची कंपनीच्या गेटवर तपासणी करण्यात आली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, एकजण सोमनाथ जगताप हा कंपनीच्या गेटवरून पळून गेला. कंपनीतील कामगारांनी ओंकार जाधव आणि दिनेश लष्करे यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
Baner Fire News : केमिकल वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग
टेम्पोची पोलिसांच्या वाहनाला धडक, तीन जखमी ( Pimpri Chichwad Crime News 23 June 2025)
पुणे-मुंबई महामार्गावर भक्ती शक्ती चौकाजवळ निगडी येथे वाहतूक नियमन करत असलेल्या पोलिसांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात मेट्रोचे तीन वॉर्डन गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवार (२१ जून) आणि रविवार (२२ जून) च्या मध्यरात्री एक वाजता घडली.
रोशन झुगरु रॉय (२८, बिहार) असे टेम्पो चालकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नागनाथ कानगुडे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लखन शिवाजी शिंदे, साहिल नारायण पवार, मोहन गंगाधर अवचार अशी जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागनाथ कानगुडे हे निगडी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री ते भक्ती शक्ती चौकाजवळ पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक नियमन करत होते. त्यांच्यासोबत मेट्रोचे वॉर्डन लखन शिंदे, साहिल पवार आणि मोहन अवचार हे देखील होते. आरोपी रोशन याने त्याच्या ताब्यातील टेम्पोने मेट्रोच्या बॅरीगेट्स आणि पोलिसांच्या जीपला धडक दिली. या अपघातात मेट्रोचे तीन वॉर्डन जखमी झाले. पोलिसांनी रोशन याला अटक केली आहे.
ट्रकखाली चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू ( Pimpri Chichwad Crime News 23 June 2025)
ट्रकखाली चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (२२ जून) सकाळी दहा वाजता मामुर्डी येथे घडली.
नवीन बालाजी इडगुलु (35) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी नवीन यांच्या पत्नीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राम जालिंदर शेवाळकर (३९, देहूरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन हे त्यांच्या दुचाकीवरून मामुर्डी येथे जात होते. डी मार्ट समोर आल्यानंतर आरोपी राम याने त्याच्या ताब्यातील डंपरने एका ट्रकला धडक दिली. ट्रकची धडक दुचाकीला बसली. या अपघातात नवीन हे ट्रकच्या चाकाखाली आले. ट्रकने दुचाकी काही अंतरापर्यंत फरफटत नेली. यामध्ये नवीन यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.
Vadgaon Maval : भाजपा आंदर मावळ , वडगाव , कामशेत मंडलच्यावतीने संकल्प सभा संपन्न
कंपनीतील साहित्याचा अपहार, प्रोडक्शन सुपरवायजरवर गुन्हा दाखल ( Pimpri Chichwad Crime News 23 June 2025)
कंपनीत काम करणाऱ्या प्रोडक्शन सुपरवायजरने कंपनीतील साहित्याचा अपहार केला. ही घटना रविवारी (२२ जून) दुपारी दोन वाजता टेक्नोक्राफ्ट इंजिनिअरिंग आंबेठाण येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
संजय श्यामलाल विश्वकर्मा (३२, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विठ्ठल सिद्धप्पा जकाते (३७, चाकण) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय विश्वकर्मा हा आंबेठाण येथील टेक्नोक्राफ्ट इंजिनिअरिंग या कंपनीत प्रोडक्शन सुपरवायजर पदावर काम करत होता. त्याने एक लाख ८२ हजार ८०० रुपये किमतीच्या पंचिंग शीटचा अपहार करून कंपनीचे नुकसान केले. हा प्रकार उघडकीस येताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीवरून जाणाऱ्या कामगाराला मारहाण करून लुटले ( Pimpri Chichwad Crime News 23 June 2025)
कंपनीतून घरी निघालेल्या कामगाराला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करत लुटले. ही घटना शुक्रवारी (२० जून) रात्री पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी येथे घडली.
पंकज लक्ष्मीकांत कलशेट्टी (३१, मोशी) असे मारहाण झालेल्या कामगाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक रावसाहेब साठे (२६, मोई, खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज हे शुक्रवारी रात्री कामावरून घरी जात होते. दुचाकीवरून पुणे-नाशिक महामार्गावरून जात असताना कुरुळी येथे एका व्यक्तीने त्यांना अडवले. आरोपीने पंकज यांना मारहाण करून त्यांच्या खिशातून तीन हजार रुपये रोख रक्कम आणि १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन काढून घेतला. तसेच २५ हजार रुपये किमतीची दुचाकी देखील जबरदस्तीने चोरून नेली.