Team MyPuneCity – धोकादायक केमिकल वाहतूक करताना कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळे केमिकल वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग लागली. यामुळे केमिकलचा स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली. ही घटना २१ जून रोजी मध्यरात्री मुंबई-बेंगलोर महामार्गावर बाणेर येथे घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली ( Baner Fire News) नाही.
Chichwad : प्रतिभा ग्रुप ऑफ इान्स्टिट्यूटतर्फे”स्वच्छता वारी” चे आयोजन
ट्रक चालक अब्दुल अलीम मोहम्मद खलील तहसीलदार (७२, कर्नाटक), केमिकल मागवणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक आणि संबंधित कर्मचारी ( Baner Fire News) तसेच केमिकल वाहतूक करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक आणि संबंधित कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तौसिफ़ महात यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Vadgaon Maval : भाजपा आंदर मावळ , वडगाव , कामशेत मंडलच्यावतीने संकल्प सभा संपन्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोकादायक ज्वलनशील केमिकलची वाहतूक करताना स्वतंत्र वाहने वापरणे तसेच त्याबाबत शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. असे असताना देखील आरोपींनी कोणतीही परवानगी न घेता आयसोप्रोपाईल अल्कोहोल, हायड्राक्लोराइड ऍसिड ,नायट्रिक ऍसिड , फ्युमिंग ९८ आणि इतर साहित्य ट्रकमध्ये एकत्रित भरले. हे साहित्य मुंबई येथून बेंगलोर येथील थॉमस बेकर केमिकल प्रा ली या कंपनीत नेले जात होते.
मुंबई-बेंगलोर महामार्गावर बाणेर येथे केमिकल आणि कापड एकत्र आल्याने ट्रकला आग लागली. यामध्ये केमिकलच्या डब्यांचे स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली व धूर पसरला. अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणली. या घटनेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण झाले. बेकायदेशीरपणे आणि असुरक्षितरित्या केमिकलची वाहतूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात ( Baner Fire News) आला आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.