श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा पुढाकार ; उपक्रमाचे ३६ वे वर्ष – तीन पालख्यांसोबत सुसज्ज रुग्णवाहिका, डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवेची विनामूल्य सोय
Team MyPuneCity – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज,जगद््गुरु तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यासोबत वारक-यांच्या सेवेकरीता तीन सुसज्ज रुग्णवाहिका (Dagdusheth Ganapati) पुण्यातून रवाना (Dagdusheth Ganapati) झाल्या. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत या उपक्रमाची सुरुवात झाली असून मोठया प्रमाणात डॉक्टर्स, औषधे व आरोग्यविषयक सेवा पालखी सोहळा समारोपापर्यंत विनामूल्य पुरविण्यात येणार आहे.
Srijansabha Sanstha : परंपरांकडे पुन्हा एकदा वळून बघण्याची गरज – पंडित रघुनंदन पणशीकर
गणपती मंदिरासमोर रुग्णवाहिकेचे पूजन करुन या उपक्रमाचा शुभारंभ (Dagdusheth Ganapati) झाला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, ट्रस्टचे उपाध्यक्ष व उपक्रमाचे नियोजन करणारे डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, आमदार व सरचिटणीस हेमंत रासने, ज्ञानेश्वर रासने यांसह पदाधिकारी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा ३६ वे वर्ष आहे.
Adarsh Vidya Mandir : आदर्श विद्या मंदिरमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा
डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे म्हणाले, सासवड मार्गे जाणा-या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोहळ्यासोबत, लोणीमार्गे जाणा-या संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोहळ्यासोबत आणि संत सोपानकाका पालखी सोहळ्यासोबत या रुग्णवाहिका असणार आहेत. कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास करणा-या वारक-यांच्या आरोग्याची काळजी घेत, आवश्यक आरोग्यविषयक सेवा त्वरीत मिळाव्यात, याकरीता या उपक्रमाचे आयोजन केले जाते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सहयोगी वैद्यकीय संस्थांतर्फे पालखी सोहळा ज्या ज्या ठिकाणी मुक्कामास असतो, तेथे फिरता दवाखाना देखील चालविला जातो. यामध्ये त्वचा रोग, कान नाक घसा, नेत्र तपासणी, रक्तदाब, शर्करा तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात येतात. तसेच औषधोपचार विनामूल्य दिला जातो. हजारो वारकरी दरवर्षी या आरोग्य सेवेचा लाभ (Dagdusheth Ganapati) घेतात.