situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : युवा कलाकारांच्या स्वरवर्षावात रसिक झाले चिंब

Published On:
---Advertisement---

विराज जोशी, सिद्धार्थ बेलामनू यांचे बहारदार गायन

श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सांगीतिक कार्यक्रम

Team MyPuneCity –विराज जोशी आणि सिद्धार्थ बेलामनू या आश्वासक युवा कलाकारांच्या सुमधुर आणि बहारदार गायनाने रसिक स्वरावर्षावात चिंब झाले. निमित्त होते विद्याथप्रिय शिक्षक, समाजधुरीण प्रा. श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे.

श्रीराम पुजारी प्रतिष्ठानतर्फे पुण्याई सभागृह, पौड रोड, कोथरूड येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध युवा गायक आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांच्या गायन मैफलीने झाली. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात पूरिया धनाश्री रागातील ‘पार करो, अरज सुनो’ या मध्यलयीतील पारंपरिक बंदिशीने केली. याला जोडून द्रुत लयीत सादर केलेल्या ‘पायलिया झनकार मोरी’ या बंदिशीने रसिकांना मोहित केले. विराज जोशी यांना अभिजित बारटक्के (तबला), अविनाश दिघे (संवादिनी) यांनी समर्पक साथ केली.

यानंतर पंडित विनायक तोरवी यांचे शिष्य सिद्धार्थ बेलामनू आपल्या मैफलीची सुरुवात मियाँ मल्हार रागाच्या सादरीकरणाने केली. ‘सर्वांना सुख दे’ अशा अर्थाची रचना असलेली ‘सुख देहो सबन को’ ही पारंपरिक बंदिश त्यांनी अतिशय बहारदारपणे सादर केली. द्रुत लयीतील ‘बिजुरी चमके, गरजे मेघा’ या रचनेने रसिक सुखावले. सिद्धार्थ बेलामनू यांनी आपल्या मैफलीची सांगता ‘धिम तदियन धिम तदानी’ हा तराणा सादर करून केली. दमदार ताना, तार सप्तकात फिरत असलेल्या सिद्धार्थ बेलामनू यांच्या सुरेल-खुल्या आवाजातील गायन ऐकून रसिक स्वरवर्षावात चिंब झाले. सहकलाकारांबरोबर सूरांची देवाण-घेवाण आणि त्यातून रंगत गेलेली मैफल रसिकांना विशेष भावली. त्यांना प्रणव गुरव (तबला), मिलिंद कुलकण (संवादिनी), स्वप्नील गायकवाड, कबीर शिरपूरकर (तानपुरा) यांनी सुरेल साथसंगत केली.

कार्यक्रमाचा शुभारंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रकाश जोशी, कार्याध्यक्ष डॉ. नवनीत तोष्णीवाल, उमेश लळीत, रोहिणी पटवर्धन, कलापिनी कोमकली, बाळासाहेब जोशी, राम कोल्हटकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाला. तर कलाकारांचा डॉ. नवनीत तोष्णीवाल, केशव शिंदे, माजी न्यायमूर्ती उमेश लळीत, ललिता दातार यांनी केला.

डॉ. श्रीनिवास नाटेकर यांनी सोलापूरमधील सांस्कृतिक राजदूत म्हणून ओळख असणाऱ्या प्रा. श्रीराम पुजारी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचा कलाकरांशी असलेला स्नेह उलगडून दाखविला. कार्यक्रमात श्रीराम पुजारी यांच्या जीवनप्रवासावरील चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा गाडगीळ यांनी केले.

Follow Us On