Team MyPuneCity -आकुर्डी येथील ‘ऐश्वर्यम कम्फर्ट’ सोसायटीत पार्किंग शेड पाडल्याच्या घटनेवरून वाद पेटला असून, रहिवासी समीर असदुल्ला शेख यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवर ( Akurdi ) बेकायदेशीरपणे कारवाई केल्याचा आरोप केला आहे.
शेख यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “दि. ३१ मे २०२५ रोजी, म्हणजेच सरकारी सुट्टीच्या दिवशी, माझे पार्किंग शेड कोणतीही नोटीस न देता पाडण्यात आले. ही कारवाई अ प्रभाग अधिकारी शीतल वाकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली असून, त्यांनी अरेरावीची भाषा वापरून धमकीही दिली. मी याआधी लेखी जबाब आणि अर्ज सादर करून परिस्थिती स्पष्ट केली होती, तरीही माझ्या कायदेशीर हक्कावर अन्याय करण्यात( Akurdi ) आला.”
Adarsh Vidya Mandir : आदर्श विद्या मंदिरमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा
शेख यांनी नमूद केले की, “फ्लॅट खरेदी करताना बिल्डरने माझ्या नावावर कायदेशीर पार्किंग दिले होते. त्यानुसार मी शेड उभारला होता. ही जागा सोसायटीच्या अंतर्गत आहे आणि ती बिल्डरच्या मालकीची खासगी मालमत्ता आहे. त्यामुळे महानगरपालिकेला तेथे हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.”
शेख यांनी हेही सांगितले की, “‘अ’ प्रभाग कार्यालयाच्या अधिकार्यांनी बिल्डरला नोटीस देऊन दबाव आणला व माझ्या वतीने जबरदस्तीने पत्र लिहून घेतले की मी शेड काढून घेईन. अन्यथा माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात ( Akurdi ) आली.”
त्यांनी मागणी केली आहे की, “सदर पार्किंग हा मुद्दा बिल्डर आणि माझ्यातील खासगी मालकी हक्काचा वाद आहे. त्यामुळे तो सोडवण्यासाठी महानगरपालिकेने कोणतीही कार्यवाही करू नये. त्याऐवजी ज्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे कारवाई केली, त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून योग्य ती चौकशी करावी.”
या प्रकरणावर महानगरपालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही ( Akurdi ) अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सरकारी सुट्टीच्या दिवशी कोणतीही नोटीस न देता कारवाई केल्यामुळे संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिसरातील काही रहिवाशांनीही महापालिकेच्या एकतर्फी कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.