Team MyPuneCity – आज ( दि. २१ जून रोजी ) अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर(Alandi) आणि श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.योगदिनाची सुरुवात माऊलींचे प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने झाली.

श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिरच्या कार्यक्रम प्रसंगी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर,इंद्रायणी हॉस्पिटल मधील कॅन्सर रिसर्च तसेच योग प्रशिक्षक डॉ. जयदीपजी भोसले, पश्चिम महाराष्ट्र आध्यात्मिक आघाडीचे संजय घुंडरे, रुक्मिणी कांबळे ,मंगल हुंडारे , ॲड. आकाश जोशी ,शुभम धुर्वे, वासुदेव तुर्की, प्रितम किर्वे,भागवत महाराज,परमेश्वर महाराज,बंडू पालवे, विशाल थोरवे उपस्थित होते.
Pimpri Chinchwad : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवडच्यावतीने वारकऱ्यांसाठी मुठभर शेंगदाणे

कार्यक्रमाच्या प्रास्ताविका मध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी प्रशालेतील उपक्रमाची माहिती देत योगदिनाची रूपरेषा स्पष्ट केली . वैशाली शेळके यांनी 21 जून याच दिवशी योगदिन का साजरा केला जातो याची भौगोलिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी याबद्दल माहिती दिली.योगदिनानिमित्त संजय घुंडरे यांनी माऊलींची महती विशद केली .
अजित वडगांवकर यांनी आपल्या मनोगतात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Alandi) ऑनलाईन पद्धतीने मुलांशी संवाद साधून शैक्षणिक मार्गदर्शन करत असतात व त्यांच्याच प्रेरणेतून योग दिन सर्व स्तरावर साजरा केला जातो. आपल्या भारतीय प्राचीन संस्कृतीत भक्ती ज्ञान कर्म उपासना याला विशेष महत्त्व आहे व ती आपली विशेषता आहे ज्ञानेश्वर माऊली योगियांचे राजे आहेत याची प्रचिती आपल्याला संत मुक्ताबाई यांनी वेळोवेळी करून दिली.
Adarsh Vidya Mandir : आदर्श विद्या मंदिरमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा
अनेक संतांच्या साहित्यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या योगसामर्थ्या संबंधी विचार दिसून येतात असे मनोगतात व्यक्त केले. योगप्रशिक्षक डॉ.जयदीप भोसले यांनी भारतात योगाची सुरुवात ऋषीमुनींपासूनच असून माऊलींच्या संजीवन समाधीचा अर्थ स्पष्ट केला. योगाचे शरीर व मन यावर होणारे चांगले परिणाम, फायदे आजच्या आधुनिक युगासाठी असणारी योगाची (Alandi) गरज स्पष्ट केली. त्यांनी योग प्रार्थना म्हणून प्रात्यक्षिकांना सुरुवात केली.
प्राणायाम ,सूर्यनमस्कार,कपालभाती, ताडासन , वृक्षासन , त्रिकोणासन, भ्रमरी इ. योगासनांची प्रात्यक्षिके मान्यवर , शिक्षक, इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांकडून करून घेतली. प्रतिभा भालेराव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे नियोजन कांबळे निशा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी काळे वर्षा , चव्हाण राहुल, राजू सोनवणे या सर्व शिक्षक, शिक्षकेतरांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता माऊलींच्या (Alandi) पसायदानाने झाली.


श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या कार्यक्रमाला पतंजली योग समिती पिंपरी चिंचवड येथील योग मार्गदर्शिका संगीता जाधव, रोहणी वाकळे, मंगल सूर्यवंशी आणि विद्यालयातील उज्वला कडलासकर, सोनाली आवारी, शितल बागडे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन करत सहभागी विद्यार्थी व शिक्षकांकडून प्रात्यक्षिके करून घेतली. संवादाच्या माध्यमातून योग दिनाचे महत्त्व पटवून दिले तसेच योग हा प्रत्येकाच्या जीवनाचे अविभाज्य अंग असायला हवे असे सांगितले.