situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PCMC:मालमत्ताधारकांनो, १० टक्क्यांच्या सवलतीचे फक्त १० दिवसच बाकी !

Published On:
PCMC
---Advertisement---

३० जूनपर्यंत सवलतींचा लाभ घेण्याचे महानगरपालिकेचे आवाहन; १ जूलै पासून २ टक्क्यांचा विलंब दंड लागणार

Team MyPuneCity –पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी विविध सवलती जाहीर केल्या असून त्या मिळविण्यासाठी आता केवळ १० दिवस बाकी आहेत. ३० जून २०२५ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरल्यास १० टक्के सवलत असून महिलांच्या नावावर असलेल्या एका मालमत्तेसाठी ३० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. मालमत्ताधारकांनी सदर सवलतींचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

महानगरपालिकेने ‘सिद्धी उपक्रम’ अंतर्गत महिला बचत गटांमार्फत ६ लाख ३५ हजार मालमत्ता धारकांना घरोघरी जाऊन बिलांचे वाटप केले आहे. त्याचसोबत अनेक मालमत्ता धारकांना जप्तीच्या नोटीसा देखील पाठवण्यात आल्या असून, लवकरच जप्तीची कारवाईही केली जाणार आहे. सदर मोहिमेमुळे एप्रिल ते १९ जून दरम्यान महापालिकेला ३५९ कोटी ८५ लाख रुपयांचा मालमत्ताकर संकलित झाला आहे.

दरम्यान, २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये थकबाकीदारांकडून प्राप्त झालेल्या धनादेशांपैकी न वटलेल्या धनादेशाची एकूण कराची रक्कम १० कोटी १५ लाख रुपये आहे. ज्या मालमत्ताधारकांचा धनादेश वटला नाही, अशा मालमत्ताधारकांना नोटीस देत त्यांना त्यांची रक्कम रोख व ऑनलाइन माध्यमातूनच भरावी लागेल, असे महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अशा आहेत सवलती !

३० जूनपर्यंत लागू असणाऱ्या सामान्य सवलती

स्वातंत्र्यसैनिक किंवा पत्नीच्या नावावरच्या एका निवासी मालमत्तेस – ५०% सवलत

महिलांच्या नावावरच्या एका निवासी मालमत्तेस ३०% सवलत

४०% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तीच्या एका मालमत्तेस ५०% सवलत

संंपूर्ण कराची रक्कम आगाऊ भरणाऱ्यास ५% सवलत
….
खासगी शैक्षणिक संस्थांसाठी या आहेत सवलती !

१)“माझी मिळकत माझी आकारणी” योजनेअंतर्गत नोंदणीकृत मालमत्तेस – ६९% सवलत

२) नवीन आकारणी झालेल्या मालमत्तेस – ५% सवलत

३) सलग ३ वर्षे नियमित कर भरणाऱ्यास – २% सवलत

४) एप्रिल ते जून दरम्यान ऑनलाईन एकरकमी भरणाऱ्यास – ५% सवलत

५) माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी – १००% सवलत

६) इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनला – २% सवलत

नागरिकांनी वेळेवर आणि प्रामाणिकपणे मालमत्ता कर भरल्यास महापालिकेला शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण यामध्ये आणखी सुधारणा करता येते. या पार्श्वभूमीवर दिल्या जाणाऱ्या सवलती म्हणजे वेळेवर कर भरणाऱ्यांचा सन्मान आहे. नागरिकांनी ३० जूनपूर्वी कर भरून या सवलतींचा लाभ घ्यावा आणि शहराच्या विकासात योगदान द्यावे.


Pimpri Chinchwad : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवडच्यावतीने वारकऱ्यांसाठी मुठभर शेंगदाणे

-प्रदीप जांभळे पाटील ,अतिरिक्त आयुक्त, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका

महानगरपालिकेने सिद्धी उपक्रमाअंतर्गत महिला बचत गटांच्या माध्यमातून ६ लाख ४० हजार मालमत्ता धारकांपर्यंत थेट संपर्क साधत बिलांचे वितरण केले आहे. यामुळे नागरिकांमध्ये जागरूकता वाढली असून आत्तापर्यंत ३५९ कोटींहून अधिक रक्कमेचा कर भरणा झाला आहे. नागरिकांनी उर्वरित काही दिवसांत ऑनलाईन पद्धतीने किंवा थेट रोखीने कर भरून, सवलतींचा लाभ घ्यावा.

-अविनाश शिंदे ,सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Follow Us On