Team MyPuneCity – मुंबई टिळक भवन येथे ( Pimpri Chinchwad ) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसची महानगरपालिका निवडणूक आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस मधील तिन्ही विधानसभानिहाय प्रत्येक प्रभागाची माहिती अध्यक्षांना देण्यात आली. शहर काँग्रेसच्या वतीने गेल्या तीन वर्षांमध्ये राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती प्रदेशाध्यक्ष यांना देण्यात आली.
Pune : रिपब्लिकन पक्षाने पालखीचे स्वागत करत अल्पोपहारचे केले वाटप
सन २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार ३२ प्रभाग व १२८ नगरसदस्य आहेत. या सर्व प्रभागांमध्ये बूथ स्तरावर मतदार नोंदणी करून काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांनी शहर काँग्रेसच्या वतीने दिलेले उपक्रम राबवावे व तसेच महापालिकेच्या भ्रष्ट कारभारा विरोधात आंदोलने उभी करावीत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी काँग्रेसचा प्लॅन तयार आहे, त्याप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी सज्ज राहावे. तसेच प्रदेश स्तरावरून निरीक्षकांच्या मार्फत व स्थानिक नेतृत्वात विश्वासात घेऊन ( Pimpri Chinchwad ) उमेदवारीचा विचार केला जाईल, असे आपल्या मार्गदर्शनात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
Pavana Dam : पवना धरण ४४ टक्के भरले; गतवर्षीच्या तुलनेत साठ्यात मोठी वाढ
या बैठकीत पक्षाच्या आगामी रणनीतीवर सखोल चर्चा झाली. मतदार नोंदणी मोहिमेचे नियोजन, संघटनात्मक बांधणीचे मजबूतीकरण आणि प्रचार कार्यतंत्रात नवसंजीवनी देण्यासाठी विविध उपाययोजना सादर करण्यात आल्या. पक्षाच्या ( Pimpri Chinchwad ) कार्यपद्धतीला अधिक प्रभावी करण्यासाठी अनेक सूचनांची देवाणघेवाण झाली.

या बैठकीस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, माजी नगरसेवक बाबू नायर, अशोक मोरे, मनोज कांबळे, अभिमन्यु दहितुले, कौस्तुभ नवले, तुषार पाटील, मयूर जयस्वाल, ॲड.अनिरुध्द कांबळे, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, सज्जी वर्की, सोमनाथ शेळके, हिरामण खवळे, बाबासाहेब बनसोडे, अबूबकर लांडगे, गौरव चौधरी, निर्मला खैरे, प्रियंका कदम, दीपाली भालेराव, गौरी शेलार, जॉर्ज मॅथ्यू, उमेश बनसोडे, चंद्रकांत लोंढे, भरत वाल्हेकर, विशाल सरवदे, रवि नांगरे, निखिल भोईर, राहुल शिंपले, मिलिंद फडतरे, कुंदन कसबे, भिमराव जाधव, विजय ओव्हाळ, झेव्हिअर अॅंथोनी, गौतम ओव्हाळ, युनूस बागवान, विकास कांबळे, दिनकर भालेराव, शशी नायर, आबा खराडे, आशुतोष खैरे, प्रवीण कांबळे, इरफान शेख, अमित मोरे, गणेश बंदपट्टे, साहिल पवार आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित ( Pimpri Chinchwad ) होते.