Team MyPuneCity – मी आमच्या संपूर्ण वारकरी संप्रदायाला ( Slaughterhouse in Alandi) आश्वासन देतो की, कोणत्याही परिस्थितीत आळंदीत अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Pavana Dam : पवना धरण ४४ टक्के भरले; गतवर्षीच्या तुलनेत साठ्यात मोठी वाढ
पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतील आळंदी शहराजवळ विकास आराखड्यात ( Slaughterhouse in Alandi) कत्तलखाण्यासाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. आळंदीसारख्या पवित्र देवस्थानाजवळ अशा प्रकारचे आरक्षण करण्यात आल्यामुळे विविध स्तरांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिले.
Pavana Dam : पवना धरण ४४ टक्के भरले; गतवर्षीच्या तुलनेत साठ्यात मोठी वाढ
पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जो काही विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये आळंदीमध्ये एक आरक्षण कत्तलखाण्याकरिता दाखवण्यात आले आहे.
कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कट्टरखाना करता येणार नाही. त्यामुळे ते आरक्षण वगळण्याचे आदेश मी स्वतः दिले आहेत. मी आमच्या संपूर्ण वारकरी संप्रदायाला आश्वासन देतो की, कोणत्याही परिस्थितीत आळंदीत अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी ( Slaughterhouse in Alandi) म्हटले आहे.