Team MyPuneCity – भोसरीतील आदिनाथ नगर परिसरातील नागरिकांनी (Bhosari) गेल्या अनेक महिन्यांपासून डोकं वर काढलेल्या ड्रेनेज व स्ट्रोम वॉटर लाईनच्या समस्येविरोधात आवाज उठवला असून, महापालिकेकडे लेखी तक्रार दाखल करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. संत साई शाळेसमोर, माजी नगरसेवक खरात यांच्या घरामागील गव्हाणे वस्ती परिसरात ही समस्या अधिक तीव्र आहे.
Alandi : सलग दुसऱ्या दिवशी भक्ती सोपान पूल पाण्याखाली
या भागातील नागरिक गेल्या २५-३० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. (Bhosari) परंतु मागील ३-४ महिन्यांपासून येथील ड्रेनेज लाईन वारंवार चोकअप होत असून सांडपाणी व मैला रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी, शेवाळ व मच्छरांची उत्पत्ती झाली आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांचा धोका वाढला असून लहान मुलांचे, जेष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वारंवार दुचाकी अपघातही होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
Maval Crime News : धारदार शस्त्राने वार करत एकाचा खून
नागरिकांनी दररोज तक्रार करूनही महापालिकेचे कर्मचारी केवळ पाहणी करून निघून जातात. अधिकाऱ्यांचे फोन उचलले जात नाहीत, किंवा उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असा आरोप नागरिकांनी केला आहे. “महापालिकेकडे बजेट नाही” अशा कारणावर टोलवाटोलवी केली जात असल्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याशिवाय, परिसरातील नैसर्गिक पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था बंद झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या ६-७ वर्षांपासून पावसाच्या पाण्यासाठी असलेली (Bhosari) नैसर्गिक वाट एका नव्या इमारतीच्या बांधकामामुळे अडवली गेली असून त्याठिकाणी आर्यन हाइट्स ही सोसायटी उभी राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी पुढे न जाता थेट तळमजल्यातील घरांत शिरते आणि वस्तूंचे मोठे नुकसान होते.
या समस्यांमुळे रहिवाशांना केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. परिसरातील २०० ते २२५ नागरिकांनी एकत्र येत सह्या करून महापालिकेकडे लेखी निवेदन सादर केले आहे. त्यांनी नवीन व मोठी ड्रेनेज लाईन तसेच स्ट्रोम वॉटर लाईन टाकून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची जोरदार मागणी केली आहे.
महापालिकेने या तक्रारीची तातडीने दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी जोरदार अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अन्यथा आंदोलना शिवाय पर्याय नाही, असा (Bhosari) इशाराही काही रहिवाशांनी दिला आहे.